[ad_1]

यवतमाळ: पांढरकवडा शहरातील चंद्रशेखर वार्डातील २५ वर्षीय तरूण सचिन कुनघाटकर हा गुरूवारी रात्री त्यांच्या परिचित असणाऱ्या एका कार्यक्रमांमध्ये रिसेप्शन आणि स्वागत समारंभासाठी गेला होता. दरम्यान हा सर्व कार्यक्रम आटपून परत येण्याच्या तयारीत असतानाच त्याला अज्ञात मारेकऱ्यांनी काही अंतरावर नेऊन त्याच्या चेहऱ्यावर आणि डोक्यावर गंभीर स्वरूपात सशस्त्र वार केले. यामध्ये त्याचा मृत्यू झाला. त्यानंतर मृतदेह मांगुर्डा मार्गावर फेकण्यात आला. ही बाब शुक्रवारी सकाळच्या सुमारास उघडकीस येताच एकच खळबळ उडाली.घटनेचे गांभीर्य लक्षात घेता पांढरकवडा पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत पाहाणी केली. दरम्यान, घटनास्थळाचा पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीकरीता ग्रामीण रूग्णालयात पाठविण्यात आला. मिळालेल्या माहितीनुसार, गुरुवारी रात्री पांढरकवडा येथील राहुल भवनमध्ये एका लग्न समारंभात मृत सचिन व त्याचे चार पाच मित्र सहभागी झाले होते. रात्री बऱ्याच उशिरापर्यंत ते सोबत होते. वाईन बारमध्ये त्यांनी दोन ते तीन वेळा दारू सुद्धा प्राशन केल्याची माहिती आहे. त्यानंतर रात्री साडेबारा ते एक नंतर ते लग्न स्थळावरून निघून गेले. शुक्रवारी सकाळी सचिनच्या हत्येची घटना उघडकीस आली.ग्रामीण रुग्णालयात जोपर्यंत आरोपींना अटक होत नाही तो पर्यंत मृतदेहावर आम्ही अंत्यसंस्कार करणार नाही अशी भूमीका मृतकाच्या शेकडो नातेवाईकांनी घेतली. पांढरकवडा पोलिस ठाण्याच्या आवारात २०० ते ३०० लोकांचा जमाव जमला होता. त्यानंतर उपविभागीय पोलिस अधिकारी व ठाणेदार यांनी आरोपींना लवकरात लवकर जेरबंद करु अशी ग्वाही दिल्यानंतर नातेवाईकांचा रोष शांत झाला. आरोपी अजूनही अज्ञात असून पोलिस तपास करीत आहे. या प्रकरणी पाच संशयीतांना पोलिसांनी ताब्यात घेवून त्यांची कसून चौकशी सुरू केली आहे. ही हत्या जुन्या वादातून करण्यात आल्याचा संशय वर्तविण्यात येत आहे.संशयित पाच जणांना अटक..नेमकी हत्या कोणी केली हे स्पष्ट व्हायचे आहे. चौकीसाठी पोलिसांनी पाच जणांना ताब्यात घेतल्या असून पोलीस आरोपीचा शोध घेत आहे. लवकरच आरोपीचा शोध घेऊन त्यांना अटक करण्यात येईल अशी माहिती पांढरकवडा ठाणेदार अमोल माळवे यांनी दिली.

[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *