[ad_1]

मुंबई : महाराष्ट्रातील राज्यसभेच्या सहा जागांची निवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता आहे. महाविकास आघाडीने दुसरी जागा लढवली, तरच आपण चौथ्या जागेची निवडणूक लढवायची, असे भाजपने ठरवल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. त्यामुळे ठाकरे गट-शरद पवार गट-काँग्रेस यांच्या निर्णयावर राज्यसभेची निवडणूक रंगतदार होणार की बिनविरोध हे ठरणार आहे.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सागर बंगल्यावर सोमवारी भाजपच्या कोअर कमिटीची मीटिंग झाली. यामध्ये राज्यसभा निवडणुकांबाबत खलबतं झाली. यावेळी उमेदवारांवर चर्चा झाल्याचेही समजते.

महाराष्ट्र विधानसभा आमदारांच्या मतांवरुन ठरणाऱ्या राज्यसभेच्या सहा जागांची निवडणूक येत्या २७ फेब्रुवारी रोजी होणार आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने राज्यसभेच्या एकूण ५६ जागांसाठी निवडणूक जाहीर केली आहे. महाराष्ट्रातून राज्यसभेच्या सहा जागांवरील खासदार निवृत्त होत आहेत.

बाळा नांदगावकरांना लोकसभेला उतरवा, मनसे पदाधिकाऱ्यांचा आग्रह; शिंदे-ठाकरेंना धडकी भरवणारा मतदारसंघ
मतांच्या कोट्यानुसार भाजपला तीन, शिवसेना (एकनाथ शिंदे) यांना एक, तर राष्ट्रवादी (अजित पवार) यांना एक जागा सहज जिंकता येणे शक्य आहे. तर महाविकास आघाडीतून काँग्रेसला एक जागा मिळवता येणार आहे.

छगन भुजबळांसमोर नरहरी झिरवळ नतमस्तक, व्यासपीठावरच लोटांगण
ठाकरे गट-शरद पवार गट यांच्याकडे आमदारांचे पुरेसे संख्याबळ नाही. परंतु मविआने एकत्रितपणे दुसऱ्या जागेसाठी उमेदवार देण्याचा निर्णय घेतला, तर भाजपही चौथी जागा लढवणार, अन्यथा निवडणूक बिनविरोध करण्याकडे पक्षाचा कल असल्याची माहिती आहे. अर्थात अशा परिस्थिती महायुती सहाही जागा लढवेल.

अमोल कोल्हेंचा करेक्ट कार्यक्रम करण्याचा चंग, अजितदादांचा संपूर्ण परिवार शिरुरच्या मैदानात
निवृत्त झालेल्या खासदारांमध्ये भाजपच्या तीन खासदारांचा समावेश आहे. भाजप खासदार नारायण राणे, खासदार प्रकाश जावडेकर, खासदार व्ही. मुरलीधरन, शिवसेना (ठाकरे गट) खासदार अनिल देसाई, काँग्रेस खासदार कुमार केतकर आणि राष्ट्रवादी काँग्रेस खासदार (शरद पवार गट) वंदना चव्हाण यांचा सहा जणांमध्ये समावेश आहे. यापैकी कोणाला पुन्हा संधी मिळणार, याकडे सर्वांचं लक्ष आहे.

राज्यसभा खासदारांना लोकसभेत पाठवलं जाऊ शकतं, केसरकरांनी मोदींचा प्लॅन सांगितला

Read Latest Maharashtra News Updates And Marathi News

[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *