म. टा. खास प्रतिनिधी, मुंबई: मुंबईच्या समुद्रात कुलाब्याजवळ सोमवारी संशयास्पद बोट सापडल्याने खळबळ उडाली आहे. अब्दुला शरीफा १ ही बोट पोलिसांनी ताब्यात घेतली असून कुवेतवरून पळून आल्याचे बोटीवरील तीन तरूणांनी सांगितले. भारतीय असल्याचा दावा या तीन तरूणांनी केला असून याबाबत त्यांनी दिलेल्या माहीतीची शहानिशा केली जात असल्याचे पोलिसांनी सांगितले.चैत्राली नौका ही गेट वे ऑफ इंडीया ते लाईट हाउस परिसरात सागरी गस्त करीत असताना सोमवारी सकाळी एक वेगळ्या बनावटीची बोट संशयास्पदरित्या फिरताना आढळली. संक रॉक परिसरात ही बोट थांबवून तपासणी केली असता ती कुवेत देशाची असून बोटीचे नाव अब्दुला शरीफ १ असल्याचे समजले. बोटीवर असलेल्या निटसो डिट्टो, इनफन्ट विजय विनय अॅन्थोनी, जे. सहायंत्ता अनिष यांची चौकशी केली असता त्यांनी तामिळनाडूचे रहिवाशी असल्याचे सांगितले. ही बोट विनापरवाना भारतीय समुद्र हद्दीमध्ये मिळुन आल्याने चैत्राली नौकेवरील कर्तव्यास असलेले काॅन्स्टेबल थोरात यांनी नियंत्रण कक्षात कळविले. पोलिसांनी बोट ताब्यात घेऊन त्यावरील तीन तरूणांना कुलाबा पोलिस ठाण्यात आणले.यलोगेट पोलिस ठाण्याच्या अधिकाऱ्यांनी अधिक चौकशी केली असता ते कामाच्या शोधात असताना तामिळनाडू येथील एजंट कॅप्टन मदन याने दोन वर्षापूर्वी त्यांना कुवेत येथे पाठविले होते. त्यांनी त्रिंवेद्रम ते कुवेत असा विमानामार्गे प्रवास केला आहे. कुवेत येथे ते अब्दुला शरीफ यांच्या अब्दुला शरीफ १ या बोटीवर मासेमारीचे काम करीत होते. बोट मालक पैसे देत नव्हता आणि मारहाण करीत असल्याने पळ काढल्याचे तिघांनी सांगितले. बोट, तीन तरूण व त्यांच्याकडील मोबाईल, जी.पी. एस वायरलेस इत्यादीच्या आधारे कुलाबा पोलिस तसेच, आय. बी, तटरक्षक दल, इमिग्रेशन, भारतीय नौदल, ए.टी.एम, एस.आय.डी यांच्या मार्फतीने मिळालेल्या माहितीची शहानिशा व अधिक चौकशी सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *