नवी दिल्ली/चंदिगढ: दहा वर्षांपूर्वी शिवसेनेसोबत घडलेल्या घटनाक्रमाची पुनरावृत्ती आता शिरोमणी अकाली दलासोबत घडली आहे. लोकसभा निवडणुकीआधी मित्रपक्षांची संख्या वाढवण्याच्या प्रयत्नात आहे. त्यासाठी भाजपनं पंजाबमध्ये शिरोमणी अकाली दलाशी युतीची बोलणी सुरू केली. पण ही बोलणी फिस्कटल्याचं वृत्त आहे. गेल्या काही दिवसांपासून भाजप आणि अकाली दल यांच्यात युतीची चर्चा सुरू होती. पण ही बोलणी फिस्कटल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. पंजाबमध्ये आम आदमी पक्ष आणि काँग्रेसनं स्वबळावर निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतल्यानंतर आता भाजपनंही एकला चलो रेची भूमिका घेतली आहे. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अकाली दलानं शेतकरी आंदोलन, शीख कैद्यांची सुटका या मुद्द्यांवरुन भाजपवर दबाव टाकला होता. भाजपचं पंजाबमधलं नेतृत्त्वदेखील युतीच्या विरोधात होतं.अकाली दल आणि शिवसेना भाजपचे सर्वात जुने मित्र आहेत. शिवसेना आणि भाजपची युती १९८९ मध्ये झाली. २०१४ च्या विधानसभा निवडणुकीआधी जागावाटपावरुन युती तुटली. तब्बल २५ वर्षांनंतर दोन पक्षांची मैत्री तुटली होती. तर भाजप आणि अकाली दलाची युती १९९६ मध्ये झाली. जवळपास २४ वर्षे दोन्ही पक्ष सोबत होते. कृषी विधेयकांच्या मुद्द्यावरुन अकाली दलानं एनडीएमधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. २०२० मध्ये अकाली दल आणि भाजपची युती तुटली. जागावाटपामुळे बोलणी फिस्कटलीपंजाबमध्ये लोकसभेच्या १३ जागा आहेत. यापैकी ६ जागा देण्याची मागणी भाजपनं केली होती. पण अकाली दल त्यासाठी तयार नव्हता. अकाली दल एनडीएमध्ये असताना पक्ष १० जागांवर लढत होता. तर भाजप ३ जागा लढवायचा. पण आता भाजपनं दुप्पट जागा मागितल्यानं युतीची बोलणी फिस्कटली आणि महाराष्ट्रात २०१४ मध्ये झालेल्या घटनाक्रमाची पुनरावृत्ती पंजाबमध्ये घडली.२०२० मध्ये भाजपची साथ सोडल्यानंतर अकाली दलानं बहुजन समाज पक्षाशी युती केली. दोघांनी विधानसभेच्या निवडणुका सोबत लढवल्या. बसपचा राज्यात चांगला प्रभाव आहे. त्यामुळे अकाली दलाला त्यांच्यासोबतची युती तोडायची नाही. दुसरीकडे अकाली दलाच्या नेत्यांच्या मनात भाजपबद्दल नाराजी आहे. भाजपकडून अकाली दलाला कमकुवत करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. नाराज नेत्यांना फोडण्याचे प्रयत्न केले जात आहेत, असा मतप्रवाह अकाली दलात आहे.Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *