[ad_1]

ठाणे : उल्हासनगरमधील हिललाईन पोलीस ठाण्यात आमदार गणपत गायकवाड यांनी महेश गायकवाड यांच्यावर गोळीबार केला. या गोळीबार प्रकरणी आरोपी गणपत गायकवाड यांना अटक करण्यात आली आहे. गायकवाड यांचा मुलगा वैभव गायकवाड हा बेपत्ता आहे. दरम्यान, भाजप आमदार गायकवाड यांच्याकडून करण्यात आलेल्या गोळीबार प्रकरणी एक महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. या गोळीबार प्रकरणी विकी गणात्रा याला पोलिसांनी काही दिवसांपूर्वी अटक केली होती आणि आता रणजीत यादवला अटक करण्यात आली असून रणजीत यादव हा आमदार गणपत गायकवाड यांचा खासगी चालक आहे. क्राईम ब्रँच पोलिसांनी रणजीत यादवला काल शनिवारी ताब्यात घेतलं असून आज रविवारी उल्हासनगर कोर्टात हजर केलं.

गोळीबार झाल्यानंतर पोलीस ठाण्यात शिरलेल्या जमावाकडून आमदार गायकवाड यांना मारहाण होऊ नये यासाठी त्यांचे कवच बनलेला रणजित गणपत गायकवाड यांचा विश्र्वासातील चालक अशी त्याची ओळख आहे.

संबंधित घटना ही जागेच्या वादातून समोर आली आहे. या प्रकरणी पोलिसांकडून तपास सुरु आहे. पोलिसांनी या प्रकरणी शिवसेना शहरप्रमुख महेश गायकवाड आणि त्यांचे मित्र राहुल पाटील यांच्यासह ७० जणांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. या सर्व ७० जणांवर जमीन बळकावल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी उल्हासनगर न्यायालयात चार जणांना जमीन मंजूर करण्यात आला आहे.

कुठलीही परवानगी न घेता जागेवर कब्जा करण्यासाठी सशस्त्रपणे मोठ्या संख्येने शिरून, जागेवरील कामगारांना शिवीगाळ करत, जागेतील सामानाचा नुकसान केल्याचा गुन्हा त्यांच्यावर दाखल करण्यात आलाय. तर पोलिसांनी इतर ६६ जणांची चौकशी सुरू केली आहे. आत्तापर्यंत पाच जणांची चौकशी या प्रकरणी करण्यात आली आहे. महेश गायकवाड, राहुल पाटील यांच्यावर उपचार झाल्यानंतर त्यांची देखील पोलीस चौकशी करणार आहेत, अशी देखील माहिती समोर आली आहे.

[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *