[ad_1]

पर्थ : क्रिकेटच्या मैदानात पुन्हा एकदा काळजाचा ठोका चुकवणारी घटना घडली. वेस्ट इंडिजचा धिप्पाड खेळाडू आंद्रे रसेलबरोबर ही गोष्ट घडली. मैदानात फलंदाजी करत असताना एक बाऊन्सर त्याला लागला आणि त्यानंतर तो मैदानातच खाली कोसळल्याचे पाहायला मिळाली. या गोष्टीचा व्हिडिओ सध्याच्या घडीला चांगलाच व्हायरल झालेला आहे.

ही गोष्ट घडली ती १०व्या षटकात. त्यावेळी वेस्ट इंडिजची ५ बाद ८० अशी स्थिती झाली होती. आंद्रे रसेल त्यापूर्वी फक्त एकच चेंडू खेळला होता. यावेळी गोलंदाजी करत होता तो ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज स्पेन्सर जॉन्सन. ऑस्ट्रेलिया ही समोरच्या संघाला पराभूत करण्यासाठी आक्रमकपणा धारण करते. त्यावेळी वेस्ट इंडिजला एकामागून एक दोन धक्के बसले होते. कारण सात धावांमध्ये ऑस्ट्रेलियाने वेस्ट इंडिजच्या दोन फलंदाजांना माघारी धाडले होते. त्यामुळे खेळपट्टीवर असलेल्या दोन नवीन फलंदाजांना घाबरवण्यासाठी ऑस्ट्रेलियाचे गोलंदाजी आक्रमकपणे खेळत होता. १० व्या षटकाच्या पहिल्याच चेंडूवर जॉन्सनने बाऊन्सर टाकला. या चेंडूवर फटका मारण्याचा प्रयत्न रसेल करत होता. पण या चेंडूचा वेग एवढा होता की, त्याला फटका मारणे जमले नाही. उलट फटका मारण्यासाठी तो गेला असता हा चेंडू त्याच्यावरच आदळला. हा चेंडू रसेलवर आदळला आणि तो क्षणातच मैदानात पडल्याचे पाहायला मिळाले. ही गोष्ट एवढ्या लवकर झाली की, नेमकं काय घडं हे कोणालाच कळलं नाही. या चेंडूचा आघात एवढा जास्त होता की, रसेलसारखा उंचपुरा खेळाडू सावरू शकला नाही. त्यानंतर वेस्ट इंडिजच्या डॉक्टरांनी मैदानात धाव घेतली आणि त्यांनी त्याच्यावर उपचार केले.

यानंतर रसेलने हार मानली नाही. तो मैदानात उभा राहीला आणि त्यानंतर त्याने ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजीचा चांगलाच समाचार केला. रसेलने या सामन्यात फक्त २९ चेंडूंत ४ चौकार आणि सात षटकारांच्या जोरावर ७१ धावांची तुफानी खेळी साकारली. रसेच्या या खेळीच्या जोरावर वेस्ट इंडिजच्या संघाला प्रथम फलंदाजी करताना २२० धावांचा डोंगर उभारता आला.

मुंबई इंडियन्सचं कर्णधारपद पांड्याला, पुणेकरांच्या प्रतिक्रिया काय?

रसेल आणि शेरफेन रदरफोर्ड यांच्या अर्धशतकांच्या जोरावर वेस्ट इंडिजने २२० धावा उभारल्या आणि ऑस्ट्रेलियावर ३७ धावांनी विजय साकारला.

[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *