[ad_1]

Malaika Arora च्या ड्रेसिंग आणि स्टाईलिंग सेन्सची बऱ्याचदा जगभर चर्चा होते. मलायका ही एक अशी सुंदरी आहे जी वयाच्या 50 मध्येही इतकी हॉट बोल्ड दिसते की तिच्यासमोर विशीतल्या तरूणी चाय कम पाणी वाटतात. तिच्या फॅशन सेन्सबद्दल बाेलताना बऱ्याचदा असे म्हटले जाते की जगाची तमा न बाळगता अन् वयाचं कारण न पुढे करता हवे तसे कपडे घालण्याची जबरदस्त हिंमत तिच्यामध्ये आहे. ती सगळ्याच प्रकारचे कपडे खूप छान पद्धतीने कॅरी सुद्धा करते. पण तरीही तिचा कपड्यांचा चॉईस अनेकांना आवडत नाही.पण यावेळी मात्र तसे मुळीच झालेले नाही. उलट तिच्या फॅशनचं अनेकजण भरभरून कौतूक करत आहे (Malaika Arora’s lime green saree). मलायकाने नेसलेली पाेपटी- लिंबू कलरच्या साडीची किंमत तब्बल 75 हजार रूपये इतकी आहे. (Malaika Arora’s Banarasi Saree worth Rs. 75 thousand) असल्याचं सांगितलं जातं. तिचे हे भरजरी साडीतील कातील फोटोज बघून तुम्हीही नक्कीच मंत्रमुग्ध व्हाल. (फोटो सौजन्य :- malaikaaroraofficial)

[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *