ठाणे : उल्हासनगर हिललाईन पोलीस स्टेशनमधील वरिष्ठ पोलीस निरीक्षकाच्या दालनातच कल्याण पूर्व शिवसेना शहर प्रमुख महेश गायकवाड यांच्यावर गोळीबार झाल्याची धक्कादायक घटना शुक्रवारी रात्री समोर आली आहे. या घटनेनं राज्यभरात खळबळ उडाली आहे. त्यादरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाण्यातील ज्युपिटर हॉस्पिटलमध्ये जाऊन कल्याण पूर्व विभागातील माजी नगरसेवक महेश गायकवाड यांच्या प्रकृतीची विचारपूस केली.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काल घडलेल्या घटनेची त्यांनी पोलिसांकडून सविस्तर माहिती जाणून घेतली तसेच गायकवाड यांच्यावर सुरू असलेल्या उपचारांबद्दल डॉक्टरांशी चर्चा केली. ”झालेली घटना ही अत्यंत दुर्दैवी असून या घटनेतून बचावलेल्या गायकवाड यांनी लवकरात लवकर पूर्ण बरे व्हावे”, अशी भावना मुख्यमंत्री शिंदे यांनी यावेळी व्यक्त केली.

शिंदेंना ठाण्यातच आव्हान; कोण आहेत गोळीबार करणारे भाजप आमदार गायकवाड? पाठीमागे कोणाचा हात?
दरम्यान, काल शुक्रवारी संध्याकाळी अंबरनाथ तालुक्यातील द्वारली गावात भाजप आमदार गणपत गायकवाड आणि शिवसेना शहर प्रमुख महेश गायकवाड यांच्यात जमिनीवरून वाद सुरू होता. हा वाद शुक्रवारी संध्याकाळी उल्हासनगर हिललाईन पोलीस स्टेशनमध्ये पोहोचला. मात्र, काही वेळातच हिललाईन पोलीस स्टेशनच्या आतच या वादात शिवसेना शहर प्रमुख महेश गायकवाड यांच्यावर गोळीबार झाला. त्यामुळे जखमी महेश गायकवाड यांना तात्काळ उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र गायकवाड यांच्यावर नेमका गोळीबार कोणी केला, याबाबत माहिती मिळू शकली नाही.

दरम्यान, भाजप आमदार गणपत गायकवाड यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर अनेक गंभीर आरोप केले आहेत. “होय, मी गोळीबार केला. मला माझ्या कृत्याचा कोणताही पश्चाताप नाही. मुख्यमंत्र्यांनी मला गुन्हेगार बनवलं. एकनाथ शिंदेंच मुख्यमंत्रिपदी राहणार असतील तर राज्यात गुन्हेगारांचं राज्य येईल”, अशा शब्दांत गायकवाड यांनी थेट शिंदेंना लक्ष्य केलं. त्यांनी देवेंद्र फडणवीस यांच्याबद्दल नाराजी बोलून दाखवली.

भाजप आमदाराच्या गोळ्या झेलल्या, शिंदे गटातील महेश गायकवाड आहेत कोण? कार्यकर्ते मानतात भावी आमदारSource link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *