[ad_1]

नांदेड: ऑनर किलिंगच्या घटनेने नांदेड जिल्हा पुन्हा हादरला आहे. दुसऱ्या जातीमधील मुलासोबत प्रेम विवाहाचा अट्टाहास करणाऱ्या मुलीला जन्मदात्या माता पित्यानेच संपवलं. गुरुवारी रात्री जिल्हातील हिमायतनगर तालुक्यात ही घटना घडली. शुक्रवारी शवविच्छेदनावेळी डॉक्टरांना संशय आल्याने हा प्रकार उघडकीस आला. या प्रकरणी हिमायतनगर पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल केला असून मृत मुलीच्या आई वडिलांना ताब्यात घेतले आहे. ऑनर किलिंगच्या या घटनेने खळबळ उडाली आहे.

याबाबत हिमायतनगर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार नांदेड जिल्ह्यातील हिमायतनगर शहरातील नेहरूनगर भागातील एका कुटुंबातील मुलीचं प्रेम परिसरातील एका युवकाशी जुळले होते, हा प्रकार लक्षात आल्यावर घरच्यांनी मुलीची समजूत काढली. तरी देखील महिन्याभरापूर्वी ती प्रेम करणाऱ्या मुलासोबत पळून गेली होती. तेव्हा घरच्यांनी पळवून नेणाऱ्या युवकाविरोधात हिमायतनगर पोलिसात तक्रार दिली. त्यानंतर मुलगी अल्पवयीन असल्यानं पोलिसांनी त्या युवकाविरोधात पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल केला होता. गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी मुलीला समजावून सांगत आई वडिलांच्या स्वाधीन केले होते. मात्र, मुलीच्या वागण्यात काही सुधारणा झाली नाही, पुन्हा देखील ती पळून गेलेल्या त्या मुलासोबत लग्न करायचे, असा अट्टाहास करत होती.
वादामुळे पत्नी मुलांसह माहेरी; पती आणि सासू मुलांना भेटायला गेले, मित्रांच्या मदतीने मेव्हणा नको ते करुन बसला अन्…
आई-वडिलांनी मुलीच्या वागण्याला कंटाळून आणि समाजात होत असलेल्या बदनामीच्या भीतीने ती गुरुवारी मध्यरात्री गाढ झोपेत असताना आई वडिलांनी विळ्याने शरीरावर वार करून तिचा खून केला. दरम्यान घटनेनंतर आई वडिलांनी मुलीला शासकीय रुग्णालयात दाखल केले. लेकीनं आत्महत्या केली असा बनाव आई वडिलांकडून केला जात होता. मात्र, मुलीच्या शरीरावर जखमा आढळून आल्याने डॉक्टरांना संशय आला आणि डॉक्टरांनी तात्काळ पोलिसांना माहिती दिली. हा प्रकार लक्षात येताच पोलिसांनी रुग्णालयात धाव घेतली.
पतीला संपवून आपण काहीच न केल्याचा बनाव, पण एक चूक अन् पत्नी-प्रियकर जाळ्यात अडकले
शवविच्छेदनानंतर पोलिसांनी मृत मुलीच्या आई वडिलांना ताब्यात घेतलं आहे, अशी माहिती अतिरिक्त पोलीस अधीक्षक अभिनाश कुमार यांनी दिली. दरम्यान मुलीच्या हत्येप्रकरणी पोलिसांनी आई वडिलांविरोधात कलम ३०२ अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा अधिक तपास सुरु असल्याची माहिती अतिरिक्त पोलीस अधीक्षक अभिनाश कुमार यांनी दिली.
गाडी घेण्यासाठी माहेरहून पैसे आण, दारु पिऊन मारहाण अन् मानसिक छळ, विवाहितेचा संशयास्पद मृत्यू
Read Latest Maharashtra News And Marathi News

अर्जुन राठोड यांच्याविषयी

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.

[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *