[ad_1]

जळगाव : शिवसेना शिंदे गटाचे आमदार किशोर पाटील यांनी स्थानिक पत्रकाराला धमकी दिल्याची ऑडिओ क्लिप व्हायरल झाली होती. या प्रकाराने संपूर्ण राज्यात खळबळ उडाली होती. ज्या पत्रकाराला आमदारांनी शिवीगाळ केली होती, त्याच पत्रकाराला मारहाण झाल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. आमदार किशोर पाटील समर्थकांनी मला मारहाण केल्याचा आरोप स्थानिक पत्रकार संदीप महाजन यांनी केला आहे.

अश्लील शिवीगाळ केल्याची ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्याच्या प्रकारानंतर स्थानिक पत्रकार महाजन यांनी माझ्या जीवाला धोका असल्याचे सांगत पोलीस संरक्षणाची मागणी केली होती. तसेच मला काहीही झाल्यास त्याला जबाबदार आमदार किशोर पाटील व त्यांचे सहकारी असतील असं सुद्धा म्हटलं होतं.

कलावती म्हणाल्या, मोदी सरकारने मला काहीच दिलं नाही, राहुल गांधींमुळे माझं आयुष्य बदललं, अमित शहा तोंडघशी!
दरम्यान, आज (गुरूवारी) सकाळी याच स्थानिक पत्रकाराला मारहाण करतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झालाय. आमदार किशोर पाटील यांच्या समर्थकांनीच मला मारहाण केली, असा आरोप संबंधित मारहाण झालेल्या स्थानिक पत्रकार संदीप महाजन यांनी केला आहे. यापुढेही माझ्या आणि कुटुंबियांच्या जीविताला धोका असून पोलिसांनी आता तरी संरक्षण द्यावं, असं पत्रकार महाजन म्हणाले.

दरम्यान मारहाणीनंतर पत्रकार संदीप महाजन यांनी पाचोरा पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. माध्यमांशी बोलताना ते म्हणाले, “आधी मला शिव्या दिल्या गेल्या. आता मला मारहाण झाली आहे. याआधाही माझ्या जीवाला आमदारांपासून आणि त्यांच्या कार्यकर्त्यांपासून धोका असल्याचं मी म्हणाले होतो. मात्र माझ्या मागणीनंतरही पोलिसांनी मला संरक्षण दिलं नाही. आताही मला आणि माझ्या कुटुंबाला असुरक्षित वाटतंय. मला व माझ्या कुटुंबाला काही झालं तर त्याला जबाबदार आमदार किशोर पाटील आणि पोलीस प्रशासन राहील”

शरद पवारांचं पंतप्रधानपद कुणामुळे हुकलं? अजितदादांची मोदींना टाळी, त्यांचीच री ओढली!
नेमकं प्रकरण काय?

जळगाव जिल्हा सध्या एका अल्पवयीन मुलीच्या अत्याचार आणि हत्या प्रकरणावरुन हादरला आहे. या प्रकरणावरुन स्थानिक पत्रकाराने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर भाष्य करणारी बातमी केली. ही बातमी किशोर पाटील यांना चांगलीच झोंबली. किशोर पाटील यांनी पत्रकार महाजन यांना फोन करून अश्लील शिवीगाळ केली. एवढ्यावरच ते थांबले नाहीत, तर त्यांच्या समर्थकांकडून आज पत्रकार महाजन यांना मारहाणही केली आहे.

मी पत्रकाराला शिव्या दिल्या, ऑडिओ क्लिप माझीच ; आमदार किशोर पाटलांची जाहीर कबुली

[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *