[ad_1]

रोम: चीजखाली दबल्यानं ७४ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. इटलीच्या लोम्बार्डी परिसरात ही घटना घडली. जियाकोमो कियापारिनी असं मृत व्यक्तीचं नाव आहे. कियापारिनी त्यांच्या चीज फॅक्टरीत काम करत होते. तेव्हा ४०-४० किलो वजनाचे चीज व्हिल्स त्यांच्या अंगावर पडले. हे चीज व्हिल्स फॅक्टरीतील रॅकवर ठेवण्यात आले होते. कियापारिनी यांच्या मृत्यूमुळे त्यांच्या कुटुंबावर शोककळा पसरली आहे. गेल्या अनेक वर्षांपासून ते चीज निर्मितीच्या व्यवसायात होते.जियाकोमो कियापारिनी फॅक्टरीत काम करत असताना अचानक एक रॅक मोडला आणि त्यात ठेवण्यात आलेले चीज व्हिल्स धडाधड खाली कोसळले. काही क्षणांमध्ये जियाकोमो चीजखाली अडकले. त्यांच्या सुटकेसाठी आलेल्या पथकानं रात्रभर त्यांचा शोध घेतला. पथकानं लाकडी कपाट आणि त्यातून खाली पडलेले चीज व्हिल्स बाजूला केले. बारा तासांनंतर पथकाच्या हाती जियाकोमो कियापारिनी यांचा मृतदेह हाती लागला. जियाकोमो कियापारिनी दरवर्षी त्यांच्या कारखान्यात १५ हजार चीज व्हिल्स तयार करायचे. ग्राना पडानो चीज तयार करण्यात त्यांचा हातखंडा होता. ग्राना पडानो चीज इटलीमध्ये खूप प्रसिद्ध आहे. चीजच्या कारखान्यात ३३ फुटांपर्यंत चीज व्हिल्स ठेवण्यात आले होते. या दुर्घटनेत ७ मिलियन युरो म्हणजेच ६३.६० कोटी रुपयांचं नुकसान झालं.जियाकोमो कियापारिनी रविवारी रात्री कारखान्यात असलेला चीजचा स्टॉक तपासत होते. त्यावेळी लाकडी कपाट मोडलं आणि त्यातील तब्बल १५ हजार चीज व्हिल्स त्यांच्या अंगावर पडले. कारखान्याजवळ राहणाऱ्यांनी मोठा आवाज ऐकला. त्यांनी याची माहिती अग्निशमन दलाला दिली. त्यांनी तातडीनं घटनास्थळी धाव घेतली. चीज व्हिल्स स्वच्छ करण्यासाठी जियाकोमो कियापारिनी मशीनचा वापर करत होते. त्या मशीनमुळे लाकडी कपाट हललं असावं, असा अंदाज अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांनी वर्तवला. या घटनेचा तपास सुरू आहे. त्यातून चीजनं भरलेलं कपाट कोसळण्यामागचं कारण समोर येईल. जियाकोमो कियापारिनी वापरत असलेल्या मशीनमध्ये बिघाड झाला असावा असा स्थानिक अधिकाऱ्यांचा अंदाज आहे.

[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *