[ad_1]

मुंबई : देशातील खासगी क्षेत्रातील सर्वात मोठी बँक असलेल्या एचडीएफसी बँकेने कोट्यवधी ग्राहकांना धक्का दिला आहे. एचडीएफसी बँकेने एमसीएलआर (MCLR) वाढवला आहे. एमसीएलआरमधील वाढीचा थेट परिणाम तुमच्या गृहकर्ज, कार कर्ज, वैयक्तिक कर्ज, वाहन कर्जाच्या ईएमआयवर होतो. म्हणजेच तुमच्या कर्जाचा ईएमआय वाढेल. एचडीएफसी बँकेकडून नवीन कर्ज घेणाऱ्या ग्राहकांना पूर्वीपेक्षा जास्त व्याजदर द्यावे लागतील आणि नवे दर आज, ८ फेब्रुवारीपासून लागू झाले आहेत. एचडीएफसी बँकेच्या वेबसाइटनुसार, बँकेने काही कालावधीचा एमसीएलआर ०.१०% वाढला आहे.

Paytm Payments Bank च्या लाखो ग्राहकांसाठी मदतीला धावून आली SBI, १ मार्चपासून इथे मिळेल सुविधा
एचडीएफसी बँक नवीन MCLR दर

– एमसीएलआर बँकेने रात्रीच्या कालावधीचा एमसीएलआर ०.१० टक्के वाढवून ८.८० टक्क्यांवरून ८.९०% केला आहे.
– एका महिन्याचा एमसीएलआर 0.5 टक्के वाढला आहे. हा दर ८.८५ टक्क्यांवरून ८.९०% झाला.
– तीन महिन्यांचा एमसीएलआर वाढून ८.१०% झाला.
– सहा महिन्यांचा एमसीएलआर ९.३०% झाला आहे.
– एक वर्षापेक्षा जास्त कालावधीसाठी एमसीएलआर ९.३०% झाला असून त्यात ०.०५% वाढ करण्यात आली असून पूर्वी तो ९.२५ टक्के होता.
– दोन वर्षांपेक्षा जास्त कालावधीचा एमसीएलआर ९.३५ टक्के आहे.
– तीन वर्षांपेक्षा जास्त कालावधीसाठी एमसीएलआर ९.३५ टक्के आहे.

सेव्हिंग अकाउंटमध्ये असायला हवा कमीत कमी बॅलन्स; वाचा SBI, HDFC, ICICI बँकेत मिनिमम बॅलन्स मर्यादा किती?
एमसीएलआर कसा ठरवला जातो?

ठेवी दर, रेपो दर, परिचालन खर्च आणि रोख राखीव प्रमाण राखण्याची किंमत यासह एमसीएलआर ठरवताना विविध घटक विचारात घेतले जातात. रेपो दरातील बदलांचा एमसीएलआर दरावर परिणाम होतो. एमसीएलआर मधील बदल कर्जाच्या व्याजदरावर परिणाम करतात. यामुळे कर्जदारांचा ईएमआय वाढतो.

प्राप्तिकर विवरणपत्र न भरणाऱ्यांना लवकरच नोटिसा; केंद्रीय प्रत्यक्ष करमंडळ करणार कारवाई
एमसीएलआर वाढवण्याचा परिणाम
एमसीएलआरमधील वाढीचा परिणाम गृहकर्ज, वाहन कर्ज, वैयक्तिक कर्ज यासह सर्व प्रकारच्या कर्जाच्या व्याजदरांवर दिसून येईल. कर्ज ग्राहकांना पूर्वीपेक्षा जास्त ईएमआय भरावा लागेल. नवीन कर्ज घेणाऱ्या ग्राहकांना महागडे कर्ज मिळेल. MCLR वाढल्यामुले कर्ज घेणे महागाते, ज्यामुळे लोकांकडे खर्च करण्यासाठी पैसे कमी होतात परिणामी घरातील खर्च कमी होऊ शकतो आणि आर्थिक संकटांना सामोरे जावे लागू शकते. तथापि MCLR वाढल्याने बँकांचा नफा मार्जिन वाढतो म्हणजे बँका अधिक नफा मिळवू शकतात.

Read Latest Business News

[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *