नागाव: कोंबडीच्या गुप्तांगात फटाका फोडण्यात आल्याचा संतापजनक घटना घडली आहे. घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. चार मुलांनी कोंबडीच्या गुप्तांगात फटाका टाकला. त्यानंतर त्याची वात पेटवली. फटाका फुटल्यानंतर कोंबडीचा वेदनादायी शेवट झाला. आसामच्या नागाव जिल्ह्यातील राहा गावात ही घटना घडली.सोशल मीडियावर व्हायरल झालेला व्हिडीओ एका स्वयंसेवी संस्थेपर्यंत पोहोचला. त्यांनी या प्रकरणात प्रशासन आणि पोलिसांनी लक्ष घालून कारवाईची मागणी केली आहे. व्हिडीओमध्ये पांढऱ्या रंगाची कोंबडी दिसत आहे. चारपैकी दोन तरुणांनी तिला धरुन ठेवलं आहे. तिच्या गुप्तांगात फटाका लावण्यात आला आहे. अन्य दोघांनी फटाक्याची वात पेटवली. फटाका फुटल्यानंतर कोंबडीचा वेदनादायी शेवट झाला. यानंतर मुलांनी घडलेल्या घटनेवर विनोद केले. त्यावेळी एक मुलगा हातात मृत कोंबडी धरुन होता. पीपल्स फॉर ऍनिमल्स नावाच्या स्वयंसेवी संस्थेनं या प्रकरणावर इन्स्टाग्रामवर मोठी पोस्ट लिहिली आहे. ‘आसामच्या नागावमध्ये एक कोंबडीचा निर्दयी कृत्यामुळे बळी गेला. ४ मुलांनी तिच्या गुप्तांगात फटाका लावून तो फोडला. त्यामुळे कोंबडीनं तडफडून जीव सोडला,’ असं संस्थेनं पोस्टमध्ये नमूद केलं आहे. या पोस्टमध्ये आरोपी तरुणांचं इन्स्टा हँडल मेन्शन करण्यात आलं आहे. पोस्टमध्ये पोलीस , नागाव पोलीस, डीजीपींना टॅग करण्यात आलं असून आरोपींविरोधात कठोर कारवाईची मागणी करण्यात आली आहे.