[ad_1]

मुंबई : भाजप आमदार राणा जगजितसिंह पाटील यांच्या पत्नी अर्चना पाटील यांनी गुरूवारी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे, महिला प्रदेशाध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्या उपस्थितीत त्यांनी राष्ट्रवादीचे घड्याळ आपल्या मनगटावर बांधले. दरम्यान प्रवेशानंतर धाराशिव लोकसभा मतदारसंघातून लगोलग अर्चना पाटील यांना प्रदेशाध्यक्ष तटकरे यांनी उमेदवारीही जाहीर केली.महायुतीच्या जागा वाटपामध्ये धाराशिवची जागा राष्ट्रवादी काँग्रेसला देण्यात आली आहे. धाराशिव मतदारसंघात अर्चना पाटील या मोठ्या फरकाने विजयी होतील, असा विश्वास सुनील तटकरे यांनी यावेळी व्यक्त केला. शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार तथा विद्यमान खासदार ओमराजे निंबाळकर यांच्या विरोधात अर्चना पाटील लढतील.
भाजप आमदाराची पत्नी राष्ट्रवादीच्या तिकिटावर रिंगणात? पतीच्या पराभवाचा वचपा काढण्यास उत्सुक

कोण आहेत अर्चना पाटील?

राणा जगजितसिंह पाटील यांच्या पत्नी अर्चना पाटील यापूर्वी उस्मानाबाद जिल्हा परिषदेच्या उपाध्यक्षा होत्या. सध्या त्या सक्रीय राजकारणात नव्हत्या, मात्र आता लोकसभेच्या आखाड्यातून त्या शड्डू ठोकतील.

राणा जगजितसिंह पाटलांनी २०१९ ची लोकसभा निवडणूक राष्ट्रवादीच्या तिकीटावर लढवली होती. शिवसेनेच्या ओमराजे निंबाळकर यांच्या विरोधात राणा ताकदीने लढले, पण त्यांना ओमराजेंनी धूळ चारली होती. मात्र लोकसभेनंतर राणा जगजितसिंहांनी भाजपमध्ये प्रवेश करून विधानसभेची निवडणूक लढले. तुळजापूर मतदारसंघातून ते विधानसभेवर गेले.
साताऱ्यात धक्कातंत्र, पृथ्वीराज चव्हाण यांचं नाव फायनल झाल्याची चर्चा, जयंत पाटलांचं गुफ्तगू!

राणा जगजितसिंह पाटील आणि ओमराजे निंबाळकर हे नात्याने चुलत बंधू आहेत. मागील वेळी दोन भावांमध्ये लढत झाली होती, यंदा दीर-भावजयीमध्ये लढत होत आहे. आपल्या पतीच्या पराभवाचा बदला घेण्याचा अर्चना पाटील पुरेपूर प्रयत्न करतील.

धाराशिवचा सस्पेन्स संपला, ओमराजेंविरोधात लढणाऱ्या अर्चना पाटलांविषयी बोलताना कार्यकर्ते कडाडले!

तुम्हाला बाहेरून उमेदवार आयात का करावा लागला?

तुम्हाला बाहेरच्या पक्षातून उमेदवार का आयात करावा लागला? असा प्रश्न पत्रकारांनी सुनील तटकरे यांना विचारला, त्यावर ते म्हणाले, “आपण देशात आणि राज्यात पाहिले तर उमेदवारांची निवडून येण्याची क्षमताच विचारात घेतली जाते. या गोष्टींचा सारासार विचार करत आम्हाला राज्यात ४५ पेक्षा जास्त जागा निवडून आणण्यासाठी अर्चना पाटील यांना धाराशीवमधून उमेदवारी दिली गेली”

[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *