[ad_1]

गोपाळ गुरव : कोलकाता नाइट रायडर्स संघाने आयपीएल टी-२० क्रिकेट स्पर्धेत दिल्ली कॅपिटल्स संघावर १०६ धावांनी शानदार विजय मिळवला. या विजयात कोलकात्याचा अष्टपैलू खेळाडू आंद्रे रसेलचाही मोलाचा वाटा होता. मात्र, ज्या खेळाडूने रसेलला बाद केले. त्याचे त्याने कौतुक केले.

कोलकाता नाइट रायडर्स संघाने दिल्लीच्या गोलंदाजांची येथेच्छ धुलाई करून ७ बाद २७२ धावांपर्यंत मजल मारली. यात सुनील नारायण, अंगक्रिश रघुवंशी यांनी आक्रमक अर्धशतक ठोकली. यांच्यात वेस्ट इंडिजचा रसेलही सामील झाला होता. त्याने १९ चेंडूंत चार चौकार व तीन षटकारांसह ४१ धावा केल्या. त्याचा झंझावात वेगवान गोलंदाज इशांत शर्माने रोखला. इशांतने ताशी १४४ किलोमीटर वेगाने इनस्विंग यॉर्कर टाकला. मिडल आणि लेगच्या बरोबरमध्ये चेंडू गेला आणि यष्ट्या उडाल्या.

विशेष म्हणजे हा यॉर्कर इतका जबरदस्त होता, की रसेलसारख्या कसलेल्या फलंदाजाला आपला तोल सांभाळता आला नाही. तो जमिनीवर पडला. रसेलने जमिनीवरून उठून सर्वांत आधी दोन्ही हात उंचावून ईशांतचे कौतुक करून खिलाडूवृत्ती दाखवली. खरे तर मैदानात खेळाडू एकमेकांना भिडतानाच दिसतात. आपण चांगल्या चेंडूवर बाद झाल्यानंतर प्रतिस्पर्धी गोलंदाजाकडे खुन्नसने बघतात. मात्र, ईशांतने टाकलेला चेंडू खरेच अप्रतिम होता. त्यामुळे रसेलने त्याला मनापासून दाद दिली. रसेलने या कृतीने प्रेक्षकांची मने जिंकली. त्यामुळे सोशल मीडियावर हा व्हिडिओ चांगलाच व्हायरल झाला होता.

या षटकात ईशांत आठ धावाच दिल्या. त्यामुळे कोलकात्याला सर्वोच्च धावसंख्या रचता आली नाही. विक्रमी धावसंख्या रचण्यासाठी कोलकात्याला अखेरच्या षटकात १४ धावांची गरज होती. रसेल मैदानात असल्याने ते शक्यही होते. मात्र, ईशांतने अचूक मारा केला. ईशांतने ३ षटकांत ४३ धावांत दोन विकेट घेतल्या. त्याआधीच्या स्पेलमध्ये ईशांतच्या षटकात सुनील नारायणने तीन षटकार व दोन चौकारांसह २६ धावा चोपल्या होत्या. मात्र, ईशांतने यातून सावरून अप्रतिम यॉर्करवर रसेलला बाद केले. विशेष म्हणजे २०१६मध्ये हैदराबादकडून खेळणाऱ्या मुस्तफिझूर रहमानने रसेलला अशाच पद्धतीने बाद केले होते.

वानखेडेवर शर्मा गटाची हद्द, मांजरेकरांनी खडसावलं, पंड्याची अवस्था पाहून रोहितने काय केलं?

क्रिकेट हा सभ्य गृहस्थांचा खेळ म्हणून ओळखला जातो. त्यामुळे मैदानात खेळाडू कशी संघभावना दाखवतात, हे पाहणेही तितकेच गरजेचे असते.

[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *