[ad_1]

वृत्तसंस्था, इस्लामाबाद : ऐन निवडणुकीच्या तोंडावर चार गुन्ह्यांत झालेला कारावास, पक्षाचे निवडणूक चिन्हे गोठवलेले अशा प्रतिकूल स्थितीतही इम्रान खान यांच्या ‘तेहरिक-ए-इन्साफ’ (पीटीआय) पक्षाने पुरस्कृत केलेल्या उमेदवारांनी सार्वत्रिक निवडणुकीत प्रारंभिक आघाडी घेतली आहे. त्यामुळे कारागृहात असूनही इम्रान ‘किंगमेकर’ ठरण्याची शक्यता आहे. माजी पंतप्रधान नवाझ शरीफ यांच्या पक्षाला दुसऱ्या क्रमांकाच्या जागा मिळाल्या असून, त्यांनीही आपला पक्ष विजयी झाल्याचा दावा केला आहे.

पाकिस्तानच्या निवडणूक आयोगाने शुक्रवारी सायंकाळपर्यंत जाहीर केलेल्या निकालांमध्ये इम्रान खान यांच्या ‘तेहरिक-ए-इन्साफ’ (पीटीआय) पक्षाने समर्थन दिलेल्या उमेदवारांनी ९९ जागा जिंकल्या होत्या. त्याखालोखाल नवाझ शरीफ यांच्या पाकिस्तान मुस्लिम लीग (नवाझ) पक्षाने ७१ जागा जिंकल्या. बिलावल भुट्टो झरदारी यांच्या पाकिस्तान पीपल्स पार्टी पक्षाला ५३ जागा मिळाल्या आहेत. एमक्यूएम-पी पक्षाला १४, आईपीपीला २, जेयूआई-पी २, पीएनपी आणि एमडब्ल्यूएमला प्रत्येकी एक जागा आणि इतरांना ७ जागा मिळाल्या आहेत.

या निवडणुकीत गैरप्रकार केले जातील आणि आमच्या प्रतिस्पर्ध्यांच्या बाजूने निकाल वळवले जातील, असे आरोप इम्रान खान आणि त्यांच्या समर्थकांनी निवडणुकीआधी केले होते. मात्र, शुक्रवारी समोर आलेले प्रारंभिक निकाल सर्व पक्षांना अचंबित करणारे ठरले आहेत.

परभणीची जागा १०० टक्के शिंदेंच्या शिवसेनेकडेच राहणार, राष्ट्रवादी काँग्रेसची अवस्था बिकट : सईद खान

नवाझ शरीफ यांनीही विजयाचा दावा केला आहे. लाहोर येथे शरीफ कुटुंबीयांना जोरदार शक्तिप्रदर्शन केले. शरीफ यांच्या घराबाहेर समर्थकांची मोठी गर्दी झाली होती. ‘३३६ सदस्यसंख्या असणाऱ्या नॅशनल असेंब्लीमध्ये बहुमातासाठी १६९ जागा आवश्यक असतात. मात्र, सध्याच्या निकालांनुसार आम्हाला १५० जागा मिळतील. सरकार बनविण्यासाठी तेवढ्या पुरेशा आहेत,’ असे ‘पीटीआय’चे अध्यक्ष गोहर खान यांनी जिओ न्यूज या वृत्तवाहिनीला सांगितले.
…तरीही पाकिस्तानात ‘सिलेक्शन’

नवाझ यांचा आघाडी सरकारचा प्रस्ताव

‘आमचा पक्ष सर्वांत मोठा पक्ष ठरला आहे,’ असा दावा करून पाकिस्तान मुस्लिम लीगचे प्रमुख नवाझ शरीफ यांनी, ‘आम्ही आघाडी सरकार बनविण्यास तयार आहोत, अशी भूमिका घेतली. ‘शाहबाझ शरीफ यांना मी अन्य पक्षांच्या नेत्यांशी चर्चा करण्यासाठी पाठवत आहे. सरकार स्थापन करण्यासाठी पुरेसे बहुमत आमच्याकडे नाही. आम्ही सर्व घटक पक्षांना एकत्र येण्याचे आवाहन करीत आहोत, जेणेकरून पाकिस्तानला संकटातून बाहेर काढता येईल,’ असे शरीफ यांनी पत्रकारांना सांगितले.

आर्थिकदृष्ट्या खंगलेल्या पाकिस्तानात निवडणूक लागली; किती पक्ष रिंगणात? यंदा कोण जिंकण्याची अटकळ?

एकूण जागा – ३३६

निवडणूक झालेल्या जागा – २६६

पीटीआय पुरस्कृत – ९९

पीएमएल (नवाझ) – ७१

पीपीपी – ५३

निकाल जाहीर : २५०

निकाल बाकी – १५

एका जागेची मतमोजणी लांबणीवर

(निकाल अंतिम नाही)

[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *