[ad_1]

छत्रपती संभाजीनगर: मुकुंदवाडी बस स्थानकासमोरील आरजू हॉटेलमध्ये ग्राहकाने बिर्याणीची ऑर्डर दिली. मात्र बिर्याणी चांगली नसल्याचे लक्षात येताच ग्राहकाने नूडल्स ऑर्डर केली. यावेळी देखील शिळे नूडल्स मिक्स करत असल्यामुळे ग्राहकाने मालकाकडे तक्रार केली. मालकाने ग्राहकाची तक्रार ऐकून न घेता तुझं नेहमीच झाले, असे म्हणत लोखंडी कवचाने ग्राहकाचे डोके फोडले याप्रकरणी मालक आणि इतर कर्मचाऱ्यांवर मुकुंदवाडी पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
लेकाने आईचे पांग फेडले, तिच्या सर्व इच्छा केल्या पूर्ण अन् निधनानंतरही पालखीतून काढली अंत्ययात्रा
याप्रकरणी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, राजू कान्हू पट्टेकर (३४) राहणार, ब्रिजवाडी असे मारहाणीत जखमी झालेल्या ग्राहकाचे नाव आहे. दरम्यान राजू हे मुकुंदवाडी बसस्थानक परिसरामध्ये असलेल्या आरजू हॉटेलमध्ये गेले. यावेळी त्यांनी बिर्याणी आणि नूडल्सची ऑर्डर दिली. राजू यांनी दिलेली बिर्याणीची ऑर्डर कर्मचारी पॅक करत असताना बिर्याणी खराब असल्याचे राजू यांच्या लक्षात आले. तर दुसऱ्या वेळेस नूडल्स ऑर्डर केल्यानंतर यावेळी देखील कर्मचारी शेळी नूडल्स पार्सलमध्ये टाकत असल्याचं लक्षात आलं. यावेळी त्यांनी कर्मचाऱ्यांना ताजी नूडल्स पार्सल देण्याचे सांगितलं. त्यावेळी कर्मचाऱ्यांनी काउंटरवर बोला, असे सांगितले.

शेतकरी महिलेच्या हाती ट्रॅक्टरचं स्टेअरिंग, पतीच्या मदतीसाठी शेतात उतरत स्वत:च केली फवारणी

यावेळी हॉटेल मालक रफिक पटेल यांना ही बाब राजू यांनी सांगितली. रफिक राजू हे ओळखीचे आहेत. हॉटेल मालक रफिक म्हणाले की, तुम्ही फार मस्तीला आले आहात, असं म्हणत शिवीगाळ केली. एवढ्यावरच ना थांबता हॉटेलच्या टेबलवरील लोखंडी कवच राजू यांच्या डोक्यावर मारत राजू यांचे डोके फोडले. यावेळी हॉटेल मालकाने कामगारांनाही याला मारा, असे सांगितले. पाच दहा लाख रुपये गेले तरी हरकत नाही पण याला मारून टाका, असे वक्तव्य त्यांनी केले. या प्रकरणी मुकुंदवाडी पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस करीत आहे.

[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *