[ad_1]

नवी दिल्ली : सर्वसामान्यांसाठी पोस्ट ऑफिस अनेक प्रकारच्या लहान बचत योजना चालवते. यापैकी अनेक योजना लोकांमध्ये लोकप्रिय असून अशीच एक योजना म्हणजे किसान विकास पत्र. भविष्यासाठी तुम्ही गुंतवणूकीची योजना बनवत असाल तर तुम्ही किसान विकास पत्र हा पर्याय म्हणून निवडू शकता. पोस्ट ऑफिसची ही योजना पूर्वीपेक्षा अधिक फायदेशीर ठरली आहे, कारण १२० महिन्यांऐवजी गुंतवलेली रक्कम फक्त ११५ महिन्यांत दुप्पट होते.

या योजनेत गुंतवलेल्या रकमेवर सरकार सात टक्क्यांहून अधिक व्याज देत आहे. पोस्ट ऑफिसमधील योजनांमध्ये गुंतवणूक करणे सुरक्षित मानले जाते, त्यामुळे लोक मोठ्या प्रमाणात गुंतवणुकीला प्राधान्य देतात.

शेअर बाजारातील गुंतवणुकी दरम्यान या चुका टाळा! उच्चांकावरील निर्देशांकातही सावधगिरी आवश्यक
किसान विकास पत्र योजनेच्या व्याजाचे गणित
किसान विकास पत्रातील गुंतवणूकीची रक्कम ११५ महिन्यांत दुप्पट होईल. जानेवारी २०२३ मध्ये सरकारने किसान विकास पत्राचा परिपक्वता (मॅच्युरिटी) कालावधी १२३ महिन्यांवरून १२० महिन्यांपर्यंत कमी केला होता तर, आता ते आणखी कमी करून ११५ महिन्यांवर आणला आहे. पोस्ट ऑफिसच्या वेबसाइटवर उपलब्ध असलेल्या माहितीनुसार किसान विकास पत्रामध्ये गुंतवलेल्या रकमेवरील व्याज चक्रवाढ आधारावर मोजले जाते. या योजनेत गुंतवलेल्या रकमेवरील व्याज चक्रवाढ आधारावर मोजले जाते.

तुम्ही खरेदी करताच पडझड अन् विकताच रॉकेट बनतो शेअर, असं का? समजून घ्या काय आहे नेमका लॉजिक
किसान विकास पत्र योजनेचा व्याजदर
किसान विकास पत्रामध्ये गुंतवलेल्या रकमेवर सरकारने ७.५% दराने वार्षिक व्याज निश्चित केला आहे. तुम्ही या योजनेत १००० रुपयांपासून गुंतवणूक सुरू करू शकता. यानंतर १०० रुपयांच्या पटीत गुंतवणूक करता येत असून या योजनेत जास्तीत जास्त गुंतवणुकीवर मर्यादा नाही. या योजनेत तुम्ही संयुक्त खाते उघडूनही गुंतवणूक करण्याची संधी आहे. यासोबतच किसान विकास पत्रात नॉमिनीची सुविधाही उपलब्ध आहे.

Mutual Fund मध्ये गुंतवणूक करताना या चुका करू नका… अन्यथा होईल तुमचा खिसा रिकामा
किसान विकास पात्रात खाते कसे उघडायचे?
किसान विकास पत्र योजनेत १० वर्षांपेक्षा कमी वयाच्या अल्पवयीन व्यक्तीचे खाते देखील उघडले जाऊ शकते. तथापि, एक प्रौढ व्यक्तीच्या नावाने आणि अल्पवयीन १० वर्षांचे झाल्यावर खाते त्यांच्या नावावर हस्तांतरित केले जाते. या योजनेसाठी खाते उघडण्याची प्रक्रिया खूप सोपी आहे. यासाठी पोस्ट ऑफिसमध्ये जमा पावतीसह अर्ज भरा आणि त्यानंतर गुंतवणुकीची रक्कम रोख, चेक किंवा डिमांड ड्राफ्टमध्ये जमा करा. अर्जासोबत तुम्हाला तुमचे ओळखपत्रही सबमिट करा.

लक्षात घ्या की किसान विकास पत्र ही अल्पबचत योजना असून दर तीन महिन्यांनी सरकारकडून योजनेतील व्याजदराचा आढावा घेत आवश्यकतेनुसार बदलला जातो.

[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *