[ad_1]

मुंबई– मराठी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेते अविनाश नारकर आणि अभिनेत्री ऐश्वर्या नारकर यांची जोडी म्हणजे प्रेक्षकांची अत्यंत आवडती जोडी. त्यांनी आपल्या अभिनयाने प्रेक्षकांची मनं तर जिंकलीच सोबतच त्यांनी आपल्या वागण्याने प्रेक्षकांच्या मनात घर केलं. अविनाश आणि ऐश्वर्या हे दोघेही सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असतात. ते नेहमीच त्यांचे व्हिडिओ चाहत्यांसोबत शेअर करत असतात. त्यांची सोशल मीडियावर प्रचंड फॉलोविंग आहे. नुकताच ऐश्वर्या यांनी अविनाश यांच्यासोबतचा एक कमाल रील शेअर केला होता. त्यात ते दोघेही डान्स करताना दिसतायत. मात्र या रीलसोबतच त्यांनी त्यांच्या मनातली गोष्टही चाहत्यांसोबत शेअर केली आहे. त्यांनी अविनाश यांच्या स्वभावाबद्दल सांगितलं आहे.

आलिया भट्ट एअरपोर्टवर स्पॉट

ही रील करत त्याची अविनाश त्यांचे खूप चांगले मित्र असल्याचं लिहिलं आहे. जेव्हा तुमचा नवराच तुमचा मित्र असतो तेव्हा असं कॅप्शन दिलं आहे. ऐश्वर्या यांनी पोस्ट करत लिहिलं, ‘आता २५ हून अधिक वर्ष झाली. त्याने मला कायम पाठिंबा दिला. ज्या गोष्टी मी करू शकेन की नाही याची मलाच खात्री नव्हती अशा गोष्टी करायला त्याने मला प्रोत्साहन दिलं. मला स्वतःचा शोध घ्यायला मदत केली. काही बाबतीत आमची मतं वेगळी असली तरी प्रत्येक क्षण आम्ही एन्जॉय करतो. यालाच आनंदी आयुष्य म्हणतात. मला माहितीये की एक मित्र म्हणून तू नेहमी माझ्यासोबत होतास आणि आहेस आणि यापुढेही असशील. न संपणारी मैत्री…’ त्यांच्या पोस्टवरून त्यांचं नातं अजूनही किती घट्ट आणि चिरतरुण आहे याचा अंदाज येतो.


ऐश्वर्या नारकर सध्या ‘सातव्या मुलीची सातवी मुलगी’ या मालिकेत दिसत आहेत. त्या मालिकेत रुपालीची नकारात्मक भूमिका करत आहेत. त्यांचं हे पात्रही प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलं आहे.

जुळ्या मुलींची नावं झिया आणि जायदा का ठेवली? समीर वानखेडेंनी सांगितली नावांमागची गोष्ट[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *