[ad_1]

नवी दिल्ली: ईशान्य दिल्लीत लुटमारीदरम्यान तरुणाची हत्या करण्यात आली. या प्रकरणी दिल्ली पोलिसांनी एका अल्पवयीन आरोपीला अटक केली आहे. मंगळवारी रात्री वेलकम परिसरातील जनता मजूर वसाहतीत घडलेल्या घटनेचं सीसीटीव्ही फुटेज समोर आलं. यात अल्पवयीन मुलगा तरुणावर सपासप वार करताना दिसत आहे. आरोपीनं तरुणावर जवळपास १०० वार केले. आरोपीनं लूटमारीच्या हेतूनं तरुणावर हल्ला केला होता. अवघ्या ३५० रुपयांवरुन त्यानं तरुणाचा खून केला.सीसीटीव्ही फुटेजमध्ये १६ वर्षांचा मुलगा दिसत आहेत. अल्पवयीन मुलगा तरुणावर चाकूनं सपासप वार करत आहे. गळा, डोक्यावर वार केल्यानंतर आरोपीनं तरुणाला फरफटवलं. त्यानंतर त्याचा गळा कापला. तरुणानं सुरुवातीला मदतीसाठी आरडाओरडा केला. आवाज ऐकून आसपासच्या महिला घराबाहेर आल्या. तेव्हा आरोपीनं हवेत चाकू फिरवत त्यांना धाक दाखवला. आरोपी जोरजोरात ओरडत होता. लोकांना घाबरवत होता.चाकू हल्ल्यात पीडित तरुणाचा मृत्यू झाला. यानंतर आरोपीनं त्याचा मृतदेह फरफटवत नेला. चेहऱ्यावर लाथ मारली. चाकू घेऊन नाचला. आरोपीनं तरुणाला जवळपास २० ते २५ मीटरपर्यंत फरफटवलं. पूर्ववैमनस्यातून आरोपीनं तरुणाची इतक्या निर्घृणपणे हत्या केली असावी असा अंदाज आसपासच्या लोकांनी बांधला. त्यामुळेच आरोपी हत्येनंतर नाचत असावा, मृतदेहाची विटंबना करत असावा, असा परिसरातील लोकांना वाटलं. पण वास्तव वेगळंच निघालं. आरोपीला तरुणाचं नावही माहीत नव्हतं. त्याचा उद्देश केवळ लूटमार होता.ईशान्य दिल्लीतील वेलकम परिसरात ही संपूर्ण घटना घडली. अरुंद गल्ल्या असलेल्या या परिसरात लोक दाटीवाटीनं राहतात. रात्री उशिरापर्यंत या भागात वर्दळ असते. पण असा प्रकार याआधी कोणीही पाहिलेला नाही. घटना २१ नोव्हेंबरला रात्री सव्वा अकराच्या सुमारास घडली. आरोपीनं सर्वप्रथम तरुणाला मागून पकडलं. त्यानंतर त्याचा गळा दाबला. तरुण अर्धमेला होताच आरोपीनं चाकू काढला आणि सपासप वार सुरू केले.

[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *