[ad_1]

मुंबई : मागील वर्षभर लक्षणीय तोटा सहन केलेल्या अब्जाधीश गौतम अदानी यांच्यासाठी २०२४ हे वर्ष उत्तम वर्ष ठरत आहे. एकीकडे अदानी समूह हिंडेनबर्ग रिसर्चच्या धक्कादायक अहवालातून सावरला आहे, तर दुसरीकडे गौतम अदानी यांच्या संपत्तीत लक्षणीय वाढ नोंदवली गेली असून अदानी समूहाचे अध्यक्ष गौतम अदानी आता पुन्हा एकदा १०० अब्ज डॉलरच्या क्लबमध्ये सामील झाले आहेत. ब्लूमबर्ग अब्जाधीश निर्देशांकानुसार बुधवारी गौतम अदानींची एकूण संपत्ती २.७३ अब्ज डॉलरने वाढली आणि १०१ अब्ज डॉलर झाली. गेल्या वर्षी, जानेवारी महिन्या आलेल्या हिंडेनबर्ग रिसर्चच्या अहवालानंतर अदानी प्रथमच १०० अब्ज डॉलरच्या क्लबमध्ये परतले आहेत.

RBI Policy: कोट्यवधी कर्जदारांसाठी मोठी बातमी! रेपो रेटबाबत आरबीआयचा फैसला; खिशावर काय परिणाम होणार?
हिंडेनबर्गचा प्रभाव कमी झाला

गेल्या वर्षी २४ जानेवारीला अमेरिकन शॉर्ट सेलिंग कंपनी हिंडेनबर्ग रिसर्चने अदानी समूहाबाबत अहवाल प्रसिद्ध केला आणि समूहावर शेअरच्या किमतीत फेरफार करण्यासह अनेक आरोप केले. अदानी समूहाने शॉर्ट सेलर कंपनीचे सर्व आरोप फेटाळून होते पण त्यामुळे समूहाचे शेअर मोठ्या प्रमाणात कोसळले. परिणामी समूहाचे मार्केट कॅपही निम्म्याहून कमी झाले, पण अलीकडच्या घडामोडींमुळे अदानी समूहाचे शेअर पुन्हा वधारले असून आता वर्षभरातील तोटा भरून काढत आहे. अदानी समूहाची प्रमुख कंपनी अदानी एंटरप्रायझेसचे शेअर्स बुधवारी सलग आठव्या दिवशी वधारले असून कंपनीने गेल्या आठवड्यात निकाल जाहीर केले ज्यात कंपनीने १३०% नफा नोंदवला.

गौतम अदानींची संपत्ती वाढली
दरम्यान, सध्याच्या ब्लूमबर्ग बिलियनेअर्स इंडेक्सनुसार अब्जाधीश गौतम अदानी यांची संपत्ती एका दिवसात २.७३ अब्ज डॉलर किंवा सुमारे २२,६००० कोटी रुपयांनी वाढून १०१ अब्ज डॉलर झाली. यासह जगातील अव्वल अब्जाधीशांच्या यादीत गौतम अदानींनी दोन स्थानांनी १२व्या क्रमांकावर झेप घेतली.

‘मोदींच्या गॅरंटी’ची कमाल, खरेदीनंतर संयम पाळणारे झाले मालामाल; काही महिन्यातच केला पैशांचा वर्षाव
याशिवाय संपत्ती भरमसाठ वाढ झाल्यामुळे गौतम अदानी आता श्रीमंतांच्या यादीतील आघाडीचे भारतीय अब्जाधीश आणि आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती मुकेश अंबानी यांच्या मागे विराजमान झाले आहेत. रिलायन्स इंडस्ट्रीजचे अध्यक्ष आणि सर्वेसर्वा मुकेश अंबानी यांची एकूण संपत्ती १.१ अब्ज डॉलर किंवा ९,१२३ कोटी रुपयांपेक्षा जास्त वाढून १०८ अब्ज झाली असून गौतम अदानी आणि मुकेश अंबानी यांच्यात फक्त ७ अब्ज डॉलर्सचे अंतर आहे.

अजून काय हवं… मल्टीबॅगर परतावा देणाऱ्या TATA शेअरमध्ये अजून तेजीचे संकेत, वेळीच खरेदी करणार?
गौतम अदानींची जोरदार कमाई
गेल्या वर्षी हिंडेनबर्ग अहवालानंतर गौतम अदानी यांना मोठे नुकसान झाले होते आणि संपत्तीत ६० अब्ज डॉलरची मोठी घट झाली. मात्र, आता भारतीय अब्जाधीशाने जोरदार पुनरागमन केले असून २०२४ च्या सुरुवातीस एक महिन्याहून अधिक काळ लोटला असताना सर्व अब्जाधीशांमध्ये कमाईच्या बाबतीत दुसऱ्या क्रमांकावर पोहोचले आहेत यावरून लावता जाऊ शकतो. अत्तापर्यंत गौतम अदानींनी या वर्षात आतापर्यंत १६.४ अब्ज डॉलरची कमाई केली आहे तर, मेटाचे सहसंस्थापक मार्क झुकरबर्ग यांनी सर्वाधिक ४०.५ अब्ज डॉलरची कमाई केली.

Read Latest Business News

[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *