कोलकाता: गवंडी काम करणाऱ्याचं संपूर्ण आयुष्य एका झटक्यात बदललं आहे. ज्याला त्याच्या कुटुंबाची उपजिविका भागवणेही कठीण जात होतं आता तो विलासी आयुष्य जगणार आहे. ज्याची बायको त्याच्याशी रोज भांडण करायची आज तिच त्याचं तोंड गोड करत आहे. हे सारं घडलं आहे पश्चिम बंगाल येथील मुर्शिदाबाद येथे. जिथे एक गवंडी फक्त ३० रुपये खर्चून कोट्यधीश झाला आहे.

मुर्शिदाबाद येथील राणीगंज येथे राहणारे गवंडी सुकचंद यांना लॉटरी तिकीट खरेदी करण्याचा छंद आहे. त्यांच्या या सवयीमुळे त्यांची बायको नेहमी त्यांच्याशी भांडायची. त्यामुळे त्यांच्या घरात अनेक समस्याही निर्माण झाल्या होत्या. आर्थिक समस्यांसह घरात रोज वाद व्हायचे. तरी त्यांची ही सवय सुटत नव्हती. लॉटरीचं तिकीट खरेदी करण्यासाठी त्यांनी अनेकदा जेवणाचे पैसे त्यावर उधळले.

बंद कंटेनरमधून आवाज आला, दार उघडताच समोर काळजाचं पाणी करणारं दृश्य; पाहून सारेच हेलावले
सुकचंद हे डॉक्टरांना भेटण्यासाठी ट्रेनने कोलकाता येथे जात होते. दरम्यान, त्यांची लॉटरी लागली असल्याचा फोन त्यांना आला. या लॉटरीची किंमत एक कोटी रुपये आहे. हे ऐकून सुकचंद पुढच्या स्टेशनवर उतरले आणि परतीच्या ट्रेनने थेट घरी आले, अशी माहिती त्यांनी स्वत: दिली.

३० रुपयांच्या तिकीटावर कोट्याधीश झाला

सुकचंद यांनी हे लॉटरीचं तिकीट अवघ्या ३० रुपयांमध्ये खरेदी केले होते आणि त्याच लॉटरीच्या तिकिटावर ते कोट्याधीश झाले आहेत. लॉटरी लागल्यानंतर त्यांनी सुरक्षेच्या कारणास्तव पोलिस ठाण्यात जाऊन संपूर्ण प्रकरणाची माहिती दिली.

मुंबईत काही फेक रामभक्त फिरतायत, देवेंद्र फडणवीसांनी डिवचलं

मला स्वत:ला विश्वास होत नाहीये की माझ्याकडे आता एक कोटी रुपये आहेत, असं त्यांनी सांगितलं. सुकचंद यांच्या पत्नीने सांगितले की, लॉटरी विकत घेणे हा त्यांच्या पतीचा छंद होता. लॉटरी हे त्यांचं पहिलं प्रेम असल्याचं त्यांनी सांगितल. अखेर लॉटरी जिंकून त्यांचा नवरा कोट्याधीश झाला आहे यावर त्यांचा विश्वास बसत नाहीये, असंही त्या म्हणाल्या. श्रीमंत झाल्याच्या आनंदात त्यांनी नवऱ्याला शिरा-पुरी बनवून त्याचं तोंड गोड केलं.Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *