[ad_1]

नवी दिल्ली : मार्च महिन्यात विक्रमी दरवाढ झाल्यानंतर आता सोने आणि चांदीच्या दरात हळूहळू नरमाई दिसून येत आहे. यूएस फेडरल रिझर्व्ह यावर्षी तीनदा व्याजदर कपात करण्याच्या शक्यतेमुळे जगभरात सोन्याची मागणी वाढली, ज्याचा परिणाम आंतरराष्ट्रीय तसेच भारतीय सराफा बाजारात दिसून आला. सराफा बाजारात सोन्याची किंमत विक्रमी उच्चांकावर पोहोचली, तर आंतरराष्ट्रीय बाजारातही सोन्याच्या किंमतींनी सर्व जुने रेकॉर्ड मोडून काढले. दुसरीकडे चांदीच्या दरात चढउतार दिसून आले.सोने-चांदीचे आजचे दर काय
२०२३-२४ या आर्थिक वर्षातील शेवटच्या आठवड्यात सोने आणि चांदीच्या भावात कमी नोंदवली गेली. सोन्याचा वायदा भाव ६६,००० रुपयांच्या खाली घसरला तर चांदीच्या वायदाही घसरणीसह ७४,७०० रुपयांच्या आसपास व्यापार करत आहे. तसेच आंतराष्ट्रीय बाजारातील सोने आणि चांदीच्या वायदे घसरले आहेत.
Multibagger Stock: बुलेट स्पीडने धावतोय अंबानींचा शेअर, चार वर्षात केलं मालामाल; वेळीच खरेदी करावा का?
सोन्याचे वायदे घसरले
सोन्याचे वायदे (फ्युचर्स) भाव आज घसरणीसह उघडले. मल्टी कमोडिटी एक्सचेंज (MCX) वर सोन्याचा एप्रिल वायदा आज ७३ रुपये घसरणीसह ६५,९४९ रुपयांवर उघडला तर सध्या ११७ रुपये घसरून ६५,९०५ रुपयांवर व्यवहार करत होता. मार्च महिन्याच्या सुरुवातीला ६६,००० रुपयांवर उसळी घेतल्यावर सोन्याच्या वायदा किमतीने गेल्या आठवड्यात ६६,९४३ रुपये प्रति १० ग्रॅमचा नवीन ऑल-टाइम उच्चांकावर भरारी घेतली.

चांदीची चमकही पडली फिकी
सोन्याप्रमाणे चांदीचे वायदेही घसरले आहेत. MCX वर चांदीचा मे वायदा ९४ रुपयांनी घसरून ७४,८२९ रुपयांवर उघडला तर सध्या २१२ रुपये घसरणीसह ७४,७११ रुपये प्रति किलोवर ट्रेंड करत इहत. एकीकडे सोन्याची झळाळी वाढ असताना गेल्या वर्षी डिसेंबर महिन्यात चांदीचा भाव ७८,५४९ रुपये प्रति किलोवर पोहोचला होता. अशाप्रकारे तब्बल तीन महिन्यांपासून उच्चांकावरून चांदीच्या भावात सतत घसरण होताना दिसत आहे.
Personal loan: वैयक्तिक कर्ज हवंय… SBI, HDFC सह या बँकांमध्ये आहे कमी व्याजदर
आंतरराष्ट्रीय बाजारात सोने आणि चांदीत घसरण
आंतरराष्ट्रीय बाजारात आज सोन्या-चांदीच्या वायदेच्या किमतीत नरमाई दिसून आली. कॉमेक्सवर सोने २,१७३ डॉलर प्रति औंसवर उघडले. वर चांदीचे वायदे २४.८४ डॉलरवर उघडले.

[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *