[ad_1]

अमरावती: अमरावती लोकसभा मतदारसंघातून महायुतीची उमेदवारी कोणाला मिळणार याकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलं आहे. विद्यमान खासदार नवनीत राणांना पुन्हा उमेदवारी मिळणार का, त्या हाती कमळ घेणार का, याची चर्चा गेल्या अनेक दिवसांपासून सुरू आहे. राणा यांच्या जात प्रमाणपत्राचा निकाल लवकरच लागेल. १ एप्रिलला हा निकाल लागेल. त्यांच्या बाजूनं निकाल लागल्यास २ एप्रिलला राणा यांना भाजपकडून उमेदवारी घोषित केली जाईल. निकाल विरोधात गेल्यास भाजपनं प्लान बी तयार ठेवला आहे.

नवनीत राणा यांच्या जात प्रमाणपत्राचं प्रकरण न्यायप्रविष्ट आहे. निकाल विरोधात गेल्यास राणा यांना निवडणूक लढवता येणार नाही. ही शक्यता लक्षात घेऊन भाजपनं पर्याय तयार ठेवले आहेत. प्रसिद्ध उद्योजिका कल्पना सरोज यांच्या नावाचा विचार सुरू आहे. त्या मूळच्या अकोला जिल्ह्यातील आहेत. दिवंगत रिपब्लिकन नेते रा. सु. गवई यांच्या कन्या कीर्ती गवई यांच्यासह एका माजी आयएएस अधिकाऱ्याचं नावही विचाराधीन आहे. त्यामुळे भाजपकडे अमरावतीसाठी तीन पर्याय तयार आहेत. राणा यांच्या विरोधात निकाल गेल्यास या तिघांपैकी एका नावावर शिक्कामोर्तब होऊ शकतं.
श्रीकांत शिंदेंविरोधात तगडा उमेदवार मिळेना; ठाकरेंकडून कल्याणसाठी काँग्रेस नेत्याला ऑफर?
अमरावती लोकसभेची जागा राणा यांच्या युवा स्वाभिमान पक्षाला सोडण्यात येणार असल्याची माहिती खात्रीलायक सुत्रांनी दिली. त्यामुळे नवनीत राणा या पुन्हा एकदा युवा स्वाभिमान पक्षाकडूनच लढणार असल्याचं जवळपास निश्चित मानलं जात आहे. राणा भाजपमध्ये प्रवेश करतील आणि कणल चिन्हावर लढतील अशी चर्चा अनेक दिवसांपासून सुरू होती. लक्ष्मीच्या हाती कमळ असतंच, असं सूचक विधान राणा यांनी केलं होतं. त्यामुळे राणा भाजपच्या चिन्हावर लढतील या चर्चेला उधाण आलं होतं.
राज्यात पुन्हा तिसरी आघाडी? वंचितच्या गोटात वेगवान हालचाली; आंबेडकरांना कोणाकोणाची साथ?
राणा यांच्यावर नेमके काय आरोप?
नवनीत राणा यांच्यावर जात प्रमाणपत्रासाठी शाळा सोडल्याचा बनावट दाखला दिल्याचा आरोप आहे. राणा यांच्या वडिलांनी फसवणूक करुन प्रमाणपत्र मिळवल्याचा आरोप आहे. नवनीत राणा आणि त्यांच्या वडिलांविरोधात मुलुंड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. यानंतर राणा आणि त्याच्या वडिलांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.

[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *