[ad_1]

मुंबई: मुंबईकरांसाठी महापालिकेनं मोठा निर्णय जाहीर केला आहे. मुंबई महापालिका आयुक्त इकबाल चहल यांनी १० टक्के पाणीकपात रद्द करण्यात येत असल्याची घोषणा केली आहे. महापालिकेच्या या निर्णयामुळं मुंबईकरांना दिलासा मिळाला आहे. मुंबईत १ जुलै २०२३ पासून १० टक्के पाणी कपात लागू करण्यात आली होती. आता मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या अप्पर वैतरणा, मोडक सागर, तानसा, मध्य वैतरणा, भातसा, विहार, तुळशी या सातही धरणांमध्ये समाधानकारक पाणी साठा असल्यानं महापालिकेनं हा निर्णय घेतला आहे.

मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील नागरिकांना पाणीपुरवठा करणाऱ्या सर्वच तलाव क्षेत्रात जुलै २०२३ मध्ये चांगली पर्जन्यवृष्टी झाल्यामुळे जलसाठ्यामध्ये समाधानकारक वाढ झाली आहे. हीच परिस्थिती ऑगस्ट आणि सप्टेंबर २०२३ मध्ये कायम राहील, असा अंदाज आहे. हे लक्षात घेता मुंबई महानगरपालिकेतर्फे करण्यात येणाऱ्या पाणीपुरवठ्यात लागू केलेली १० टक्के पाणी कपात ९ ऑगस्ट २०२३ पासून रद्द करण्यात येत आहे, अशी घोषणा महापालिकेकडून करण्यात आली आहे.

महापालिकेनं दिलेल्या माहितीनुसार जुलै महिन्यात झालेल्या पावसामुळं ९ ऑगस्टपर्यंत मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या अप्पर वैतरणा, मोडक सागर, तानसा, मध्य वैतरणा, भातसा, विहार, तुळशी या धरणांमध्ये ८१ टक्केंच्या जवळपास पाणी साठा पोहोचला आहे. त्यामुळं १ जुलै २०२३ पासून लागू करण्यात आलेली पाणी कपात रद्द करण्यात आली आहे.
तिसऱ्या टी-२०साठी हार्दिकने काढले प्रभावी अस्त्र; विजय मिळून देणाऱ्या हुकमी एक्क्याचे पदार्पण

मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या धरणांतील पाणीसाठा

मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये ८१. ४४ टक्के पाणीसाठा आहे. अप्पर वैतरणा, मोडक सागर, तानसा, मध्य वैतरणा, भातसा, विहार, तुळशी या धरणातून मुंबईला पाणीपुरवठा केला जातो.
इर्शाळवाडीसाठी मोठी बातमी, आता लेआउटलाही मिळाली मंजुरी, एमएसआरडीसीकडून हिरवा कंदील
पाऊस आणखी दीड महिना असणार असल्याने तलावांमध्ये पुरेसा जलसाठा होऊ शकतो. त्यामुळे मुंबई महापालिकेकडून सध्या सुरू असलेली १० टक्के पाणीकपात मागे घेण्याचा प्रस्ताव पालिका आयुक्तांकडे मंजुरीसाठी पाठवण्यात आला होता. त्याला पालिका आयुक्त इकबाल सिंह चहल यांनी मंजुरी दिली. अप्पर वैतरणा, मोडक सागर, तानसा, मध्य वैतरणा, भातसा, विहार, तुळशी या सातही तलावांची पाणीसाठवण क्षमता १४ लाख ४७ हजार ३६३ दशलक्ष लिटर आहे. या तलावांतून दररोज तीन हजार ८५० दशलक्ष लिटर पाणीपुरवठा केला जातो.

उत्तर महाराष्ट्रात राष्ट्रवादीला धक्का, अनिल गोटे शरद पवारांची साथ सोडणार? निर्णय लवकरच जाहीर करणार

[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *