[ad_1]

अहमदनगर: गोहत्या रोखण्यासाठी सर्व स्तरातून अनेक प्रयत्न केले जातात. अशीच एक मोठी कारवाई नगर शहरात करण्यात आली आहे. कत्तलीसाठी आणलेल्या कोतवाली पोलिसांनी झेंडीगेट येथे पकडला आहे. परिसरात काही इसम गोवंश जातीची जिवंत जनावरे डांबून ठेऊन त्यांना अमानुषपणे वागणूक देत आहेत. त्यांची कत्तल करुन विक्री करत आहे. याची खात्रीशीर माहिती मिळाल्याने पोनि दिनेश आहेर यांनी लागलीच पथकास बातमीतील नमुद ठिकाणी जाऊन खात्री करून कारवाई करण्याचे आदेश दिले. पथकातील पोलीस अधिकारी आणि अंमलदार यांनी वरील प्राप्त माहिती प्रमाणे खात्री करून अहमदनगर शहरात झेंडीगेट परिसरात दोन ठिकाणी कारवाई करून ५७५ किलो गोमांस आणि तुकडे, २० लहान मोठी जिवंत जनावरे तसेच दोन सुरे असा एकुण ३,२०,२००/- रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करुन कोतवाली पोलीस स्टेशन येथे आरोपी विरुध्द ०२ गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. इरफान इजाज कुरेशी (३२), नसीर शेख (फरार), झिशान अय्याज कुरेशी (२९), शब्बीर कासम कुरेशी (५४) तन्वीर मोहम्मद कुरेशी (४०) या आरोपींवर महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियम १९९५ चे कलम ५ (ब) ९ सह प्राणी क्लेष प्रति अधि १९६० चे कलम ११ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कोतवाली पोलिसांनी १ मार्चपासून अवतीभवती वेळोवेळी मोठ्या प्रमाणावर छापे टाकून १९ गुन्हे दाखल करून ५१,१७,०४५ रूपयांचा माल जप्त केला आहे. पोलीस अधीक्षक राकेश ओला, अपर पोलीस अधिक्षक प्रशांत खैरे, उपविभागीय पोलीस अधिकारी अनिल कालकाडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव, पोलीस अंमलदार गणेश धोत्रे, सतिष भांड, योगेश भिंगारदिवे, रियाज इनामदार, सलीम शेख, सुजय हिवाळे, अमोल गाढे, संतोष जरे यांनी ही कारवाई केली आहे.

[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *