[ad_1]

मुंबई: म्हाडाच्या मुंबई गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळातर्फे मुंबईतील विविध गृहनिर्माण योजनांतर्गत अंधेरी, जुहू, गोरेगांव, कांदिवली, बोरीवली, विक्रोळी, घाटकोपर, पवई, ताडदेव, सायन येथे उभारण्यात आलेल्या ४,०८२ सदनिकांच्या विक्रीकरिता १४ ऑगस्ट, २०२३ रोजी सकाळी ११.३० वाजता संगणकीय सोडत काढण्यात येणार आहे, अशी माहिती राज्याचे गृहनिर्माण मंत्री अतुल सावे यांनी आज दिली.

म्हाडाच्या वांद्रे पूर्व येथील मुख्यालयात आज आयोजित आढावा बैठकीनंतर झालेल्या पत्रकार परिषदेत अतुल सावे बोलत होते. मुंबई मंडळाच्या सोडतीला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून ०१,२०,१४४ पात्र अर्जाची संगणकीय सोडत काढण्यात येणार आहे, अशी माहिती अतुल सावे यांनी दिली. सर्व अर्जदारांची प्रतीक्षा व उत्सुकता लक्षात घेता १४ ऑगस्ट रोजी मुंबई मंडळाच्या सदनिका विक्रीची सोडत राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते काढण्यात येणार आहे. या कार्यक्रमास राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार देखील उपस्थित राहणार असल्याचे सावे यांनी संगितले.याप्रसंगी गृहनिर्माण विभागाच्या अपर मुख्य सचिव वल्सा नायर-सिंह, ‘म्हाडा’चे उपाध्यक्ष तथा मुख्य कार्यकारी अधिकारी संजीव जयस्वाल, मुंबई मंडळाचे मुख्य अधिकारी मिलिंद बोरीकर उपस्थित होते.
मुकेश अंबानींनी त्यांचे सुपर लक्झरी घर विकले?, कितीला विकली ही मालमत्ता जाणून घ्या
गृहनिर्माण मंत्री पदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर अतुल सावे यांनी पहिल्यांदाच म्हाडा कार्यालयास आज भेट दिली. म्हाडा भवनात झालेल्या बैठकीत अतुल सावे यांनी म्हाडाच्या कामकाजाचा, प्रकल्पांचा आढावा घेतला. यामध्ये गिरणी कामगारांच्या घरांच्या सोडतीचे नियोजन, बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्प, कामाठीपुरा पुनर्विकास प्रकल्प आदी प्रकल्पांचा समावेश होता. अतुल सावे म्हणाले की, गृहनिर्मिती क्षेत्रातील वाढत्या मागणीची पूर्तता करणे अवघड असले तरी अशक्य नाही. पुनर्विकास प्रकल्पांच्या माध्यमातून अधिकाधिक घरांची निर्मिती होऊ शकते. याकरिता पुनर्विकास प्रकल्पांचे प्रश्न सोडविण्यासाठी कायदे व नियमावलीमध्ये बदल करण्यासंदर्भात शासनातर्फे विशेष प्रयत्न केले जाणार असल्याची माहिती अतुल सावे यांनी यावेळी दिली.
लोकलच्या लेडीज डब्यात जाण्याची संधी हुकली, महिला थेट मोटरमनच्या केबिनमध्ये, दिवा स्थानकात ड्रामा, काय घडलं?
मुंबई मंडळातर्फे सोडतीत जाहीर ४०८२ सदनिकांमध्ये प्रधानमंत्री आवास योजना (शहरी) अंतर्गत १९४७ सदनिकांचा समावेश आहे. प्रधान मंत्री आवास योजना प्रकल्पातील घरे पहाडी गोरेगाव येथे असून या घरांकरिता २२,४७२ अर्ज प्राप्त झाले आहेत. तसेच उत्पन्न गटनिहाय अत्यल्प उत्पन्न गटातिल ८४३ सदनिकांसाठी २८,८६२ अर्ज प्राप्त झाले आहेत आणि या उत्पन्न गटातील सर्वाधिक अर्ज कन्नमवार नगर विक्रोळी (४१५) या योजनेकरिता प्राप्त झाले आहेत. तसेच अल्प उत्पन्न गटातील १०३४ सदनिकांसाठी ६०,५२२ अर्ज प्राप्त झाले असून सर्वाधिक अर्ज पहाडी गोरेगांव(४१६) या योजनेकरिता आहेत आहेत तर मध्यम उत्पन्न गटातील १३८ सदनिकांसाठी ८३९५ अर्ज प्राप्त झाले असून सर्वाधिक अर्ज उन्नत नगर गोरेगांव येथील गृहनिर्माण योजनेकरिता आले आहेत आणि उच्च उत्पन्न गटातील १२० सदनिकांसाठी २०६८ अर्ज प्राप्त झाले असून सर्वाधिक अर्ज शिंपोली कांदीवली पश्चिम येथील गृहनिर्माण योजनेकरिता आहेत.
अमित शाहांनी विचारलं राहुल गांधी जांच्या घरी गेले त्या कलावती यांचं काय झालं? काँग्रेसचा पुराव्यासह पलटवार

सोडत काढली, नंबर लागला, पैसे भरले पण घरच नाही?; म्हाडाचा अधिकारी गैरहजर, रिकाम्या खुर्चीला हार घालून निषेध

[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *