[ad_1]

नवी दिल्ली : मणिपूरमधील हिंसाचारावरून केंद्र सरकारविरोधात विरोधी पक्षांनी अविश्वास प्रस्ताव मांडला. या प्रस्तावावरील चर्चेत विरोधी पक्षांनी सत्ताधारी भाजप आणि एनडीएवर गंभीर आरोप केले. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी मंगळवारी भाजपवर मोठा आरोप केला. भाजपने सत्तेत आल्यापासून ९ सरकारं पाडली, असं सुप्रिया सुळे म्हणाल्या होत्या. सुप्रिया सुळे यांच्या आरोपाला आज केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनीही जोरदार प्रत्युत्तर देत विरोधकांना अडचणीत आणलं.
अमित शाहांनी विचारलं राहुल गांधी जांच्या घरी गेले त्या कलावती यांचं काय झालं? काँग्रेसचा पुराव्यासह पलटवार
मणिपूरमधील हिंसाचारावरील आरोपांना आणि विरोधकांच्या अविश्वास प्रस्तावावरील चर्चेला अमित शहा यांनी सरकार भूमिका मांडत विरोधकांची कोंडी करण्याचा प्रयत्न केला. मणिपूरच्या चर्चेसाठी विरोधकांना पत्र दिलं होतं. सरकार चर्चेला तयार नाही, असा संभ्रम निर्माण केला गेला. आम्ही या मुद्द्यावर पहिल्या दिवसापासून चर्चेला तयार होतो. मणिपूरमधील हिंसाचाराच्या घटनांवर राजकारण करणं हे दुर्दैवी आहे. मणिपूरमधील हिंसाचार हा दुर्दैवी आहे. या हिंसाचाराचे समर्थन मुळीच होऊ शकत नाही. पण हिंसाचार आणि दंगली यापूर्वीच्या काँग्रेस सरकारच्या काळातही झाल्या. पण आम्ही कधीही अशा दंगलींचा संबंध राजकीय पक्षाशी जोडला नाही. आणि दंगलींबाबत उत्तर देताना कुठल्या गृहमंत्र्यालाही रोखलं नाही. आणि संसेदचं कामकाजही थांबवलं नाही. आम्ही कायम शांततेचं समर्थन केलंय, असं म्हणत अमित शहा यांनी गदारोळ करणाऱ्या विरोधी पक्षांच्या नेत्यांना सुनावलं.
राहुल गांधींवर फ्लाईंग किसचा आरोप, लोकसभेच्या एक्झिट दाराजवळ काय घडलं? वाचा आँखो देखी….
मणिपूरमधील हिंसाचाराच्या मुद्द्यावरून राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केंद्रातील सत्ताधारी भाजपवर हल्लाबोल केला होता. भाजपने गेल्या ९ वर्षांच्या सत्ताकाळात ९ सरकारे पाडली. महाराष्ट्रात दोन वेळा सरकारं पाडली, असा आरोप सुप्रिया सुळे यांनी केला होता. सुप्रिया सुळे यांच्या आरोपाला अमित शहांनी लोकसभेत जशास तसं प्रत्युत्तर दिलं.

मणिपूर हिंसाचारावरून मोदींवर निशाणा, राहुल गांधींचं UNCUT भाषण

अमित शहा सुप्रिया सुळेंना काय म्हणाले?

सुप्रिया सुळे म्हणाल्या आम्ही सरकारं पाडली. सरकार पाडण्याची सुरुवात शरद पवार यांनी केली. महाराष्ट्रात सर्वप्रथम सरकार पाडलं ते शरद पवार यांनी आणि वसंतदादा पाटील यांचं सरकार पाडून भारतीय जनसंघाचा पाठिंबा घेऊन त्यावेळी शरद पवार मुख्यमंत्री झाले, असं म्हणत अमित शहांनी सुप्रिया सुळेंच्या आरोपाला प्रत्युत्तर दिलं. यावेळी सुप्रिया सुळे यांनी अमित शहांना पुन्हा उत्तर देण्याचा प्रयत्न केला. एस. एम. जोशी हे त्यावेळी निमंत्रक होते, असं सुप्रिया सुळे म्हणाल्या. सुप्रिया सुळे बोलायला उठल्या त्यावेळी अमित शहा जागेवर बसले. त्यावेळी एस. एम. जोशी निमंत्रक होते, हे सुप्रिया सुळेंचं उत्तर ऐकून अमित शहा पुन्हा उठले. एस. एम. जोशी निमंत्रक होते तरीही मुख्यमंत्री कोण बनलं? सत्ता कोणी उपभोगली? शरद पवारच त्यावेळी मुख्यमंत्री झाले होते, असं अमित शहा म्हणाले.

[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *