[ad_1]

गयाना: भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील तिसऱ्या टी-२० सामन्याला सुरुवात झाली आहे. पाच सामन्यांच्या मालिकेतील पहिल्या दोन लढतीत भारताचा पराभव झाल्याने ही लढत संघासाठी करो वा मरो अशी आहे. हा महत्त्वाच्या सामन्यात भारताने नाणेफेक गमावली. वेस्ट इंडिजने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.

भारताने या महत्त्वाच्या लढतीत मुंबईचा युवा आणि धडाकेबाज फलंदाज यशस्वी जयस्वाल याला संधी दिली आहे. वेस्ट इंडिज दौऱ्यातच यशस्वीने कसोटी मालिकेतून पदार्पण केले होते. आंतरराष्ट्रीय टी-२०मध्ये देखील त्याने पदार्पण केले आहे. कर्णधार हार्दिक पंड्याने या लढतीत भारतीय संघात आणखी एक बदल केला आहे. रवी बिश्नोईच्या जागी कुलदीप यादवला संघात स्थान दिले आहे.

यशस्वीने वेस्ट इंडिजविरुद्धच्या दोन कसोटी सामन्यातील ३ डावात २६६ धावा केल्या होत्या. यात एक शतक आणि एका अर्धशतकाचा समावेश होता. १७१ ही त्याची सर्वोच्च खेळी होती. आयपीएलच्या १६व्या हंगामात त्याने वादळी फलंदाजी केली होती. १४ सामन्यात त्याने ६२५ धावा केल्या होत्या. त्याची सरासरी ४८.०८ तर स्ट्राइक रेट १६३.६१ इतका होता. हंगामात यशस्वीने १ शतक आणि ५ अर्धशतक केली होती. १२४ ही त्याची सर्वोत्तम खेळी होती.

कोण आहे अलीशा? लेस्बियन की बाय-सेक्शुअल, मैदानावरील गोलपेक्षा चर्चा भलत्याच गोष्टींची

वेस्ट इंडिज दौऱ्यातील कसोटी मालिकेत भारताने १-० असा विजय मिळवला होता. त्यानंतर झालेल्या ३ सामन्यांच्या वनडे मालिकेत भारताने २-१ असा विजय मिळवला. आता ५ सामन्यांची टी-२० मालिका सुरू असून टीम इंडिया २-०ने पिछाडीवर आहे. पहिल्या सामन्यात भारताचा ४ धावांनी तर दुसऱ्या सामन्यात २ विकेटनी पराभव झाला होता.

भारताची प्लेइंग इलेव्हन-
शुभमन गिल, यशस्वी जयस्वाल, सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, हार्दिक पंड्या (कर्णधार), संजू सॅमसन, अक्षर पटेल, कुलदीप यादव, अर्शदीप सिंग, यजुवेंद्र चहल, मुकेश कुमार

[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *