[ad_1]

नवी दिल्ली: विश्वचषक २०२३ मध्ये भारतीय संघ खूप शानदार कामगिरी करत आहे. भारतचे सर्वच खेळाडू जबरदस्त फॉर्मात असून भारताची गोलंदाजी बाजू अधिक आक्रमकपणे आणि यशस्वीपणे आपली कामगिरी प्रत्येक सामन्यात पार पाडत आहे. पण भारताचे हे यश मात्र पाकिस्तानींना बघवले जात नाहीय आणि मग भारताच्या खेळाडू आणि कामगिरींत विचित्र वक्तव्य समोर येत आहेत. पण आता या वक्तव्यावर खुद्द गोलंदाज मोहम्मद शमीने सोशल मीडियावरून धारदार उत्तर दिले आहे.

भारताविरुद्ध विविध चेंडूंचा वापर केल्याच्या लाजिरवाण्या दाव्याबद्दल भारताचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीने बुधवारी पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू हसन रझा यांच्यावर टीका केली. रझा यांनी एका पाकिस्तानी चॅनलवर बोलताना आरोप केला होता की, भारताला आयसीसी आणि बीसीसीआयकडून चेंडूंचा वेगळा सेट दिला जात आहे, ज्यामुळे त्यांना चालू असलेल्या एकदिवसीय विश्वचषक २०२३ मध्ये इतर कोणापेक्षाही चेंडूने चांगला प्रभाव पाडण्याची संधी दिली जात आहे.

रझा म्हणाले, ‘आम्ही पाहतो की जेव्हा ते फलंदाजी करतात तेव्हा ते खरोखरच चांगली फलंदाजी करत असतात आणि जेव्हा भारत गोलंदाजी करतो तेव्हा अचानक चेंडू हलू लागतो. ७-९ जवळचे डीआरएस कॉल त्यांच्या बाजूने गेले आहेत, सिराज आणि शमी ज्या पद्धतीने चेंडू स्विंग करत होते, त्यावरून असे वाटत होते की आयसीसी किंवा बीसीसीआय त्यांना दुसऱ्या डावात वेगळे आणि शंकास्पद चेंडू देत आहेत. बॉलची तपासणी करणे आवश्यक आहे.

शमीने इंस्टाग्रामवर हसन रझा यांच्यावर टीका करत त्यांना थोडी लाज वाटली पाहिजे असे म्हटले आहे. रझा यांना इतर कोणाचे ऐकायचे नसेल तर त्यांनी पाकिस्तानचा महान वेगवान गोलंदाज वसीम अक्रमचे वक्तव्य लक्षपूर्वक ऐकावे. शमीने आपल्या इंस्टाग्राम स्टोरीमध्ये म्हटले की, शेम ऑन यू यार, खेळावर लक्ष केंद्रित कर, अनावश्यक मूर्खपणावर नाही. इतरांच्या यशाचा कधीतरी आनंद घ्या. हा आयसीसी वर्ल्ड कप आहे, तुमची स्थानिक स्पर्धा नाही. तुम्ही खेळाडू होता ना? वसीम भाईने समजावले, समजावून सांगितले. हाहाहा… तुमचा खेळाडू वसीम अक्रमवर तुमचा विश्वास नाही.’

Mohammed Shami Instagram Story.

याआधी वसीम अक्रमनेही सामन्यानंतर रझा यांच्या कमेंटवर टीका केली होती आणि त्यांना थोडी तरी लाज बाळगण्यास सांगितले होते. अक्रम पुढे म्हणाला की हे लोक (रझा आणि पॅनेल) स्पष्टपणे यांच्या डोक्यावर परिणाम झाला आहे.

[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *