अकोला : अकोला पोलीस दलातील सहाय्यक पोलीस निरीक्षक मनोज लांडगे यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. मराठा आंदोलनावेळी अतिमहत्त्वाच्या बंदोबस्तात गैरहजर असलेल्या एपीआय मनोज दशरथ लांडगे यांच्यावर गैरवर्तणुकीचा ठपका ठेवण्यात आला आहे.

मराठा आरक्षणासाठी लढा देणाऱ्या मनोज जरांगे पाटील यांचे गेल्या अनेक दिवसांपासून आंदोलन सुरु आहे. या काळात त्यांनी जालना ते मुंबई पायी यात्रा काढली होती. या पार्श्वभूमीवर राज्यात ठिकठिकाणी आंदोलनं होणार होती. म्हणून पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त लावण्यात आला होता. या दरम्यान अनेक पोलिसांच्या रजा रद्द करण्यात आल्या होत्या. या काळात अतिमहत्त्वाच्या बंदोबस्तात असूनही गैरहजर राहिल्यामुळे गैरवर्तणुकीचा ठपका ठेवत सहाय्यक पोलीस निरीक्षक मनोज लांडगे यांना शासकीय सेवेतून निलंबित करण्यात आले आहे.

निलंबन काळात पोलीस नियंत्रण कक्ष अकोल्यात त्यांना दररोज दोन्ही वेळच्या गणनेत उपस्थित राहावे लागणार असल्याचे आदेशात नमूद करण्यात आले आहे. या आदेशामुळे अकोला पोलीस दलात चांगलीच खळबळ उडाली आहे.

नेमकं संपूर्ण प्रकरण काय?

एपीआय मनोज दशरथ लांडगे सी.एम.एस सेल अकोल्यात नियुक्त होते. ते ४ दिवस किरकोळ रजेवर असताना १० जानेवारी रोजी कर्तव्यावर हजर होणे अपेक्षित होते. मात्र प्रकृतीत अचानक बिघाड झाल्याचे कारण देत डॉक्टरांनी बेड रेस्टचा सल्ला दिला असल्याचे त्यांनी मोबाइलद्वारे कळविले. मात्र यानंतर कुठल्याही वैद्यकीय उपचाराची कागदपत्रे सादर न करता व वरिष्ठांना कुठलीही पूर्वसूचना न देता परस्पर रजेवरून त्यांनी रुग्ण निवेदन केले होते.

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील नाटकात रामायणाचा विपर्यास, ललित कला केंद्र प्रमुखांसह ६ जणांना अटक
१९ जानेवारी रोजी मनोज जरांगे पाटील यांची मराठा आरक्षणाच्या अनुषंगाने जालना ते मुंबई अशी संभाव्य पायी यात्रा होती, यामुळे राज्यात ठिकठिकाणी आंदोलने असल्याने कायदा व सुरक्षिततेच्या दृष्टीने २० ते २८ जानेवारी काळात सर्व पोलीस अधिकारी व अंमलदार यांच्या सर्व प्रकारच्या रजा रद्द करण्यात आल्या होत्या. तसेच एपीआय मनोज लांडगे अति महत्वाचे (रामप्रतिष्ठान अयोध्या) बंदोबस्तासाठी गैरहजर असल्याचे दिसून आले. त्यांच्या या गैरवर्तणुकीबद्दल निलंबन करणे आवश्यक असल्याची खात्री झाल्याने लांडगेंविरुद्ध चौकशी झाली. अकोला पोलिस अधीक्षक बच्चन सिंग यांना प्रदान करण्यात आलेल्या अधिकाराचा वापर करून त्यांना शासकीय सेवेतून तात्काळ निलंबित करण्यात आलंय.

भाजप आमदाराच्या गोळ्या झेलल्या, शिंदे गटातील महेश गायकवाड आहेत कोण? कार्यकर्ते मानतात भावी आमदार

आधीही एपीआय मनोज लांगडे ठरले वादग्रस्त

यापूर्वी सुद्धा एपीआय मनोज लांडगे एक वर्षापेक्षा अधिक काळ परस्पर सीक लिव्हवर गेले होते. याबाबत बार्शीटाकळी येथील गजानन कोगदे यांनी थेट पोलीस महासंचालक यांच्याकडे तक्रार केली होती. असे असतानाही या कालावधीत त्यांचे वेतन सुरू असल्याचे बोलले जाते. तसेच अनेकदा मनोज लांडगे हे विविध प्रकरणात वादग्रस्त ठरले आहे.

कायदा कोणीच हातात घ्यायचा नाही, फडणवीसांशी बोलणार; गणपत गायकवाड प्रकरणी अजित पवारांची प्रतिक्रिया

Read Latest Maharashtra News Updates And Marathi NewsSource link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *