अकोला : अकोल्यात राष्ट्रीय महामार्गावर मध्यरात्री ट्रक आणि चारचाकीचा भीषण अपघात झालाय. ही घटना अकोला जिल्ह्यातील माना इथे घडली आहे. चारचाकी वाहनात प्रवास करणारी लोक मित्राच्या लग्नाला गुजरात वरून वरुडकडे जात असताना ही दुर्दैवी घटना घडलीय. सूत्रांनी दिलेल्या महितीनुसार भरधाव असलेल्या चारचाकी वाहनानं ट्रकला धडक दिल्याने हा अपघात घडलाय. या अपघातात वाहन चालक धीरज वऱ्हाडे (रा. मलकापूर, जि. बुलढाणा) याचा जागीच मृत्यू झालाय. तर त्यातील अन्य चार जण गंभीर जखमी असून जखमींची उपचार मुर्तीजापुर येथील सामान्य उपजिल्हा रुग्णालयात सुरू आहेत.

याबाबत अधिक माहिती अशी की, अकोला जिल्ह्यातील मूर्तिजापुर तालुक्यातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ५३ वर मलकापूर फाटा जवळ मोठा अपघात झाला. हा अपघात काल शुक्रवारी मध्यरात्री घडला आहे. ट्रक क्रमांक (एमएच् १८ बीजी ६७८२) आणि (एमएच १८ बीआर ८६०१) क्रमांकाच्या कारचा अपघात झाल्यानं एकाजणाचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला आहे. दरम्यान, मित्राच्या लग्नाला गुजरातवरून वरुडकडे जात असतानाच ही दुःखद घटना घडली आहे.

आई-वडिलांचं दु:ख संपेना, आधी लेकाला करोनाने हिरावलं, आता मुलगीही गेली; टेम्पोखाली चिरडून अंत

पोलिसांच्या माहितीनुसार चारचाकी वाहनात पाच जण प्रवास करत होते. महामार्गावर समोर असलेल्या ट्रक चालकांनं अचानक ब्रेक लावल्याने पाठीमागे असलेली कार ट्रकला जोरदार धडकली. यामध्ये कारचा समोरील भागाचा चुराडा झाला आहे. या भीषण अपघातात बुलढाणा जिल्ह्यातील मलकापूर शहरात राहणाऱ्या धीरज वऱ्हाडे याचा जागीच मृत्यु झाला. तर अन्य चौघे जण जखमी झाले. अपघातानंतर स्थानिक नागरिकांच्या मदतीने जखमींना तातडीने उपचारासाठी मुर्तीजापुर येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. तर काही लोकांना गंभीर दुखापत झाल्याने त्यांना पुढील उपचारासाठी अकोल्याचे रुग्णालयात हलवण्यात आले आहे. विनोद गडारी, मंगल पवार, शिवप्रताप तिवारी (रा.धुळे) आणि सागर विश्वेश्वर उमाळे (रा. तिगाव मारू, पांधूर्णा, मध्यप्रदेश) असं कारमधील अन्य जखमींची नावे आहेत. जखमी आणि मृतक तरुण हे सर्व मित्र असून एका कंपनीत कामाला होते. कंपनीत असलेल्या मित्राच्या लग्नाला जात असताना ही अपघाताची घटना घडली आहे. अपघाताची माहिती समजताच आज पहाटेच मृतक आणि जखमींच्या नातेवाईकांनी रुग्णालय गाठल आहे.

अपघाताची माहिती मिळताच माना पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सुरज सुरोशे हे घटनास्थळी दाखल झाले, अन् अपघाती वाहनांना नागरिकांच्या मदतीने रस्त्याच्या बाजूला करून विस्कळीत झालेले वाहतूक सुरळीत केली आहे. दरम्यान या अपघाता प्रकरणी ट्रक चालक एकनाथ वामन महाजन (वय ४५ वर्ष, रा. नाने, ता.जिल्हा धुळे) याला ताब्यात घेतले असून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

भीषण! मुंबई-पुणे-बंगळुरु द्रुतगतीमार्गावर ५ वाहनं एकमेकांवर आदळलीSource link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *