[ad_1]

म. टा. प्रतिनिधी, मुंबई: छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते विद्याविहार आणि ठाणे ते वाशी/नेरूळ दरम्यान मध्य रेल्वेने आज, रविवारी मेगाब्लॉक जाहीर केला आहे. पश्चिम रेल्वेवर बोरिवली ते अंधेरीदरम्यान अप जलद आणि गोरेगाव ते अंधेरीदरम्यान डाउन दलद मार्गावर ब्लॉक घेण्यात येणार आहे. ब्लॉकमुळे काही लोकल फेऱ्या रद्द होणार असून, काही लोकल फेऱ्या विलंबाने धावणार आहेत.

मध्य रेल्वे (मुख्य मार्ग)

स्थानक – सीएसएमटी ते विद्याविहार

मार्ग – अप आणि डाउन धीमा

वेळ – सकाळी १०.५५ ते दुपारी ३.५५

परिणाम – ब्लॉक वेळेत धीम्या मार्गावरील सर्व लोकल फेऱ्या जलद मार्गावर वळविण्यात येणार आहेत. त्यामुळे काही लोकल फेऱ्या रद्द होणार असून, काही लोकल फेऱ्या २० मिनिटे विलंबाने धावतील.

दुर्गम पर्यटनस्थळे अन् गडकिल्ल्यांवर चिमुकल्यांसह ज्येष्ठांनाही जाता येणार, राज्यात ४० ठिकाणी रोप-वेची उभारणी

हार्बर रेल्वे

स्थानक – ठाणे ते वाशी/नेरूळ

मार्ग – अप आणि डाउन

वेळ – सकाळी ११.१० ते दुपारी ४.१०

परिणाम – ब्लॉक वेळेत ट्रान्सहार्बरवरील ठाणे ते वाशी-नेरूळ-पनवेलदरम्यान धावणाऱ्या अप-डाउन लोकल फेऱ्या रद्द राहणार आहेत. सीएसएमटी ते पनवेलदरम्यान लोकल फेऱ्या सुरू राहणार आहेत.

‘बेस्ट’साठी ९२८ कोटी रुपयांचे अनुदान; नवीन बसगाड्या, दैनंदिन खर्चासाठी पालिकेकडून तरतूद

पश्चिम रेल्वे

स्थानक – बोरिवली ते अंधेरी

मार्ग – जलद ( अप-बोरिवली-अंधेरी) (डाउन-गोरेगाव ते अंधेरी)

वेळ – सकाळी १० ते दुपारी ३ पर्यंत

परिणाम – बोरिवली ते अंधेरीदरम्यान अप जलदवरील लोकल फेऱ्या अप धीम्या मार्गावरून धावणार आहेत. गोरेगाव ते अंधेरीदरम्यान डाउन जलद लोकल फेऱ्या डाउन धीम्या मार्गावर धावणार आहेत. यामुळे काही लोकल फेऱ्या रद्द राहणार असून काही लोकल फेऱ्या विलंबाने धावणार आहेत.

मंत्री अदिती तटकरेंची लोकल प्रवासादरम्यान महिला प्रवाशांशी चर्चा

[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *