[ad_1]

बंगळुरु : भारतीय संघ या वर्ल्ड कपमध्ये अपराजित राहीला. अखेरच्या साखळी सामन्यात भारताने नेदरलँड्सवर दणदणीत विजय मिळवला. त्यामुळे आता भारतीय चाहत्यांना उत्सुकता असेल ती न्यूझीलंडबरोबर होणाऱ्या सेमी फायनलची. भारताने या सामन्यात नेदरलँड्सवर १६० धावांनी मोठा विजय साकारला.भारताच्या फलंदाजांनी धडाकेबाज कामगिरी केली आणि संघाने ४१० धावांचा डोंगर उभारला. शुभमन गिलने यावेळी ३२ चेंडूंत ५१ धावांची खेळी साकारली. या अर्धशतकासह गिलने यावेळी वर्ल्ड रेकॉर्ड रचला. या वर्षात २००० हजार धावा करणारा तो पहिलाच क्रिकेटपटू ठरला. त्यानंतर रोहितनेही आपले अर्धशतक झळकावले आणि वर्ल्ड कपमधील ५०० धावा पूर्ण केल्या. सलग दोन वर्ल्ड कपमध्ये रोहितने ही कामगिरी करून दाखवली आहे. त्याचबरोबर रोहितने यावेळी सर्वाधिक षटकारांचा विक्रमही आपल्या नावावर केला आहे. विराट कोहलीने यावेळी ५१ धावा केल्या आणि त्याला शतकाने हुलकावणी दिली. त्यामुळे आता पुढच्या सामन्यात तो ५० वे शतक साकारणार का, याची उत्सुकता सर्वांना असेल. या तिघांनही शतक झळकवता आले नाही. पण त्यानंतर श्रेयस अय्यर आणि लोकेश राहुल या दोघांनी सर्व कसर भरून काढली. कारण या दोघांचे या वर्ल्ड कपमधील हे पहिलेच शतक ठरले. श्रेयसने यावेळी ९४ चेंडूंत १० चौकार आणि पाच षटकारांच्या जोरावर नाबाद १२८ धावांची खेळी साकारली. राहुलने यावेळी ६४ चेंडूंत ११ चौकार आणि चार षटकारांच्या जोरावर १०२ धावा केल्या. या दोघांच्या शतकाच्या जोरावर भारताला ४१० धावा करता आल्या. पण भारताला यावेळी आपला ४१३ धावांचा सर्वाधिक धावांचा विक्रम मोडता आला नाही. नेदरलँड्सचा संघ ४११ धावांचे मोठे आव्हान घेऊन मैदानात उतरला होता. त्यांना दुसऱ्या षटकात मोहम्मद सिरजाने दुसरा धक्का दिला. पण त्यानंतर मात्र त्यांच्या फलंदाजांनी चिवट फलंदाजी केली. भारताच्या गोलंदाजीसमोर ते नतमस्तक झाल्याचे पाहायला मिळाले नाही. नेदरलँड्सने भारताला चांगली लढत दिली. हा सामान जिंकणे त्यांना शक्य दिसत नव्हते. पण नेदरलँड्सच्या संघाने दमदार फलंदाजी करत यावेळी सर्वांची मनं मात्र नक्कीच जिंकली.

[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *