[ad_1]

गोपाळ गुरव : भारतीय महिला हॉकी संघाची आज, बुधवारी प्रो-हॉकी लीगमध्ये नेदरलँड्सविरुद्ध लढत होणार आहे. या लीगमधील चारही लढतींत भारतीय महिलांना पराभव पत्करावा लागला आहे. त्यामुळे पुन्हा एकदा भारतीय महिला संघाची कसोटी लागणार आहे. कारण नेदरलँड्स या लीगमध्ये अपराजित आहे. जागतिक क्रमवारीत नेदरलँड्स अव्वल असून, भारतीय संघ नवव्या क्रमांकावर आहे.

पॅरिस ऑलिम्पिकमध्ये पात्र ठरण्यात अपयश आल्यापासून भारतीय महिला हॉकी संघाची कामगिरी खालावली आहे. क्रमवारीतील खालच्या क्रमांकावरील संघाकडूनही भारतीय संघाला पराभव पत्करावा लागत आहे. सध्या सुरू असलेल्या प्रो-लीगमध्येही भारतीय महिलांनी निराशा केली आहे. सविता पुनियाच्या नेतृत्वाखालील भारतीय महिला संघ प्रो-लीगमध्ये पाच सामने खेळला आहेत. यातील चार सामने भारताने गमावले असून, केवळ एक लढत जिंकण्यात भारतीय महिलांना यश आले आहे. भारताला चीनकडून १-२ असा, नेदरलँड्सकडून १-३ असा, तर ऑस्ट्रेलियाकडून ०-३ असा पराभव पत्करावा लागला. यानंतर अमेरिकेवर ३-१ असा विजय मिळवल्यानंतर चीनकडून पुन्हा १-२ असा पराभव स्वीकारावा लागला. नेदरलँड्स संघ प्रो-लीगमध्ये नऊ सामन्यांत २७ गुण मिळवून अव्वल क्रमांकावर आहे. त्यामुळे या सामन्यात भारताला अव्वल कामगिरी करावी लागणार आहे.

पेनल्टी रूपांतर गोलमध्ये कधी?

भारताच्या लेकींची कमाल, एशियन चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये सुवर्णपदकाला गवसणी

भारताची कर्णधार सविता म्हणाली, ‘आम्हाला अपेक्षित निकाल नोंदविता आलेले नाहीत. मात्र, चांगल्या कामगिरीचा मला विश्वास आहे. आम्ही लढतीत काही वेळा चांगला खेळ केला. मात्र, आम्हाला यात सातत्य राखावे लागणार आहे. तरच, आम्हाला आणखी विजय मिळवता येतील.’ अर्थात, सर्वोत्तम कामगिरी करण्यासाठी संगीताकुमारी, वंदना कटारिया, दीपिका, नवनीत कौर, सलीमा टेटे यांना चांगली कामगिरी करावी लागणार आहे. पेनल्टी कॉर्नरचे रूपांतर गोलमध्ये करावे लागणार आहे. कारण, मागील पाच सामन्यांत भारतीय महिला संघाला आतापर्यंत २१ पेनल्टी कॉर्नर मिळाले आहेत. मात्र, त्यांनाही यावरही एकदाही गोल करता आलेला नाही. अर्थात, प्रतिस्पर्धी संघाला पेनल्टी कॉर्नरवर गोल करता येणार नाही, यासाठी बचाव भक्कम करावा लागणार आहे.

[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *