[ad_1]

नवी दिल्ली: कतारमध्ये हेरगिरीच्या आरोपावरून शिक्षा सुनावण्यात आलेल्या आठ भारतीय नौदलाच्या माजी अधिकाऱ्यांची रविवारी सुटका करण्यात आली. या आठ पैकी सात जण मायदेशात परतले असून अन्य एक कमांडर पूर्णेंदू तिवारी यांच्या कागदपत्रांची पूर्तता झाल्यानंतर ते भारतात परत येतील. गेल्या वर्षी डिसेंबर महिन्यात कतारमधील न्यायालयाने अल दाहरा ग्लोबल केसमध्ये फाशीची शिक्षा सुनावली होती. नंतर ही शिक्षा जन्मठेपेत बदलण्यात आली. या सर्वांवर हेरगिरीचा आरोप होता.

भारताचे माजी अधिकारी परत आल्यानंतर भाजपचे नेते सुब्रमण्यम स्वामी यांनी एक मोठे वक्तव्य केले होते. या अधिकाऱ्यांच्या परत येण्यामागे बॉलिवूड स्टार शाहरूख खान याचा मोठा हात असल्याचा दावा त्यांनी केला होता. स्वामी यांनी केलेल्या या विधान सोशल मीडियावर व्हायरल होण्यास वेळ लागला नाही. स्वामींच्या या विधानावर बातम्या देखील प्रसिद्ध झाल्या. माजी नौसैनिकांच्या सुटेकत शाहरुख खानने महत्त्वाची भूमिका पार पाडली यावर अखरे अभिनेत्याच्या सोशल मीडिया टीमकडून खुलासा देण्यात आला आहे.

काय म्हणाले होते सुब्रमण्यम स्वामी

शाहरुख खानच्या टीमकडून निवेदन

शाहरूख खानची मॅनेजर पुजा ददलानी यांनी इंस्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे. ज्यात नौसैनिकांची सुटका होण्याच्या प्रकरणात शाहरुखचा कोणताही हात नाही. ही गोष्ट भारत सरकारच्या प्रयत्नामुळे झाली आहे. या गोष्टीशी मिस्टर खानचा काहीही संबंध नाही. त्याच बरोबर आम्ही हे देखील सांगू इच्छितो की, डिप्लोमसी आणि शासन या गोष्टी आपल्या देशातील नेत्यांना चांगल्या पद्धतीने येतात. मिस्टर खान यांना देखील अन्य भारतीयांप्रमाणे हे देखील नौसैनिक भारतात परतल्याचा आनंद आहे.

पुजा ददलानी या अनेक वर्षांपासून शाहरुखच्या मॅनेजर आहेत. खानचे प्रोजेक्ट्स, इव्हेंट्स आणि सुट्ट्या या सर्व गोष्टींची जबाबदारी ददलानी यांच्याकडे असते.

[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *