नवी दिल्ली: संसदेत डिसेंबर २०१९मध्ये मंजूर झालेला नागरिकत्व सुधारणा कायदा (सीएए) पुढच्या दोन महिन्यांत होणाऱ्या लोकसभा निवडणुकीपूर्वीच लागू केला जाईल, असे गृहमंत्री अमित शहा यांनी शनिवारी सांगितले. हा कायदा कोणाही भारतीयाचे नागरिकत्व हिरावून घेण्यासाठी नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. अमित शहा यांनी एका कार्यक्रमात बोलताना ही माहिती दिली.
पाकिस्तान निवडणुकीच्या निकालाचा अर्थ; आघाड्यांचा ‘हंगाम’, असे आहे पक्षीय बलाबल‘सीएएवरून आपल्या देशातील अल्पसंख्याकांना विशेषतः मुस्लिम समाजाला भडकवले जात आहे. हा कायदा कोणाचेही नागरिकत्व काढून घेऊच शकत नाही, कारण त्यात तशी तरतूद नाही. हा देशाचा कायदा आहे. तो पुढच्या दोन महिन्यांत निश्चितपणे अधिसूचित केला जाईल. निवडणुकीपूर्वीच हा कायदा लागू होणार असून त्याबाबत कोणीही संभ्रम बाळगू नये. काँग्रेस सरकारने सीएए लागू करण्याचे आश्वासन दिले होते. अनेक देशांमध्ये अल्पसंख्याकांवर अत्याचार होत असताना काँग्रेसने निर्वासितांना भारतात येण्याचे आश्वासन दिले होते. त्यांना इथले नागरिकत्व दिले जाईल, असे म्हटले होते.

मात्र, आता काँग्रेसच आपल्या शब्दापासून फारकत घेत आहे. बांगलादेश, अफगाणिस्तान आणि पाकिस्तानमध्ये अत्याचार सहन करणाऱ्या निर्वासितांना भारताचे नागरिकत्व देणारा असा हा कायदा आहे. तो कोणाही भारतीयाचे नागरिकत्व हिरावून घेण्यासाठी नाही’,असे शहा म्हणाले. ‘जेव्हा काँग्रेस नेत्यांनी देशाची फाळणी केली तेव्हा आपल्या शेजारील काही देशांमध्ये ख्रिश्चन अल्पसंख्याक होते. त्यांच्यावर अत्याचार होत असताना काँग्रेस नेत्यांनी त्यांना सांगितले की, तुमचे भारतात स्वागत आहे आणि तुम्हाला नागरिकत्व दिले जाईल. त्या पक्षाने ते आश्वासन पाळले नाही. मुळात बांगलादेश आणि पाकिस्तानमध्ये धर्माच्या आधारावर छळलेल्या निर्वासितांना नागरिकत्व देण्यासाठीचा हा कायदा आहे’,अशी माहिती शहा यांनी दिली.

अदानींच्या सिमेंट, स्टीलचे भाव ते दूध, कांदा, ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या व्यथा, ओमराजेंचं संसदेत भाषण गाजलं!

‘काँग्रेसच्या काळात मोदी ओबीसीत’

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जातीवर वाद होत आहे. हे अत्यंत दुर्दैवी आहे, असे सांगताना, ‘काँग्रेस नेते राहुल गांधी यांना वारंवार सार्वजनिकपणे खोटे बोलण्याची सवयच झाली आहे’,असा हल्ला शहा यांनी यावेळी चढवला. केंद्राने सन २०००मध्ये मोदींच्या जातीचा ओबीसी यादीत समावेश केला होता व त्यावेळी मोदींकडे सत्तेचे कोणतेही पद नव्हते. ना ते खासदार होते, ना आमदार होते, ना सरपंच होते. २००१मध्ये ते मुख्यमंत्री झाले, अशीही पुस्ती शहा यांनी जोडली.Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *