कानपूर: एका ९ वर्षांच्या चिमुकलील्या तिच्या सावत्र आई आणि वडिलांनी बेदम मारहाण करुन तिचा जीव घेतल्याची भयंकर घटना उत्तर प्रदेशातील कानपूर येथे घडली. इतकंच नाही तर तिचा जीव घेतल्यानंतर या दोघांनी तिला घरातच वाळलेल्या गवतात लपवून ठेवलं. रक्ताने माखलेला चिमुकलीचा मृतदेह पाहून सारेच हादरुन गेले. या घटनेने परिसरात एकच खळबळ माजली. माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी मुलीची सावत्र आई आणि वडिलांना ताब्यात घेऊन त्यांची चौकशी सुरू केली आहे.

परिसरातील नागरिकांनी दिलेल्या माहितीनुसार, ही मुलगी बेपत्ता होती. कुटुंबीय तिला आसपासच्या परिसारत शोधत होते. तेव्हा कोणालातरी कळालं की ही चिमुकली घरातच गवाताखाली आहे. परिसरातील लोकांनी जाऊन पाहिले तेव्हा मुलगी रक्ताच्या थारोळ्यात बेशुद्ध अवस्थेत पडलेली होती. सर्वांना असं वाटलं की तिचा मृत्यू झाला आहे, मात्र ती जिवंत होती. त्यानंतर पोलिसांना माहिती देण्यात आली. मुलीची सावत्र आई फरजानानेच तिला मारहाण केली, असं शेजाऱ्यांनी सांगितलं.

लोकांची गर्दी जमल्यानंतर वडील अनिशने मुलीला छतावरून खाली आणलं. मुलीला गच्चीवर वाळलेल्या गवतात लपवण्यात आलं होतं. वडील अनिशने मुलीला गच्चीवरुन खाली आणत असताना तिला जिन्यात आपटलं. चिमुकलीला तात्काळ सीएससीमध्ये पाठवण्यात आले. तेथून तिला रात्री उशिरा हॅलेट हॉस्पिटलमध्ये रेफर करण्यात आले. पण, तिथे चिमुकलीचा मृत्यू झाला.

नेमकं प्रकरण काय?

अनिशचे आधी मीरा नावाच्या महिलेशी लग्न झाले होते. मीराला चार मुलं होती. मीराच्या मृत्यूनंतर अनिशने बिहारमध्ये राहणाऱ्या फरजानासोबत लग्न केले. तिलाही एक मुलगी झाली. सावत्र आई फरजाना ही अनेकदा मुलीला मारहाण करत असे, तर अनिशने कधीही तिला अडवले नाही, असे ग्रामस्थ सांगतात. या प्रकरणाबाबत डीसीपी विजय धुल्ल यांनी सांगितले की, मुलीचे वडील अनिश आणि तिची सावत्र आई फरजाना यांना ताब्यात घेण्यात आले आहे. दोघांची चौकशी सुरू आहे. तर मुलीचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे.Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *