कोलंबो: सध्या श्रीलंका आणि अफगाणिस्तानमध्ये कसोटी सामना खेळवला जात आहे. या कसोटी सामन्यातील दुसऱ्या दिवशी अँजेलो मॅथ्यूज विचित्र पध्दतीने बाद झाला. कोलंबोच्या खेळपट्टीवर चौकार मारण्याच्या प्रयत्नात मॅथ्यूज बाद झाला. यापूर्वी अँजेलो मॅथ्यूज हा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील टाइमआउट होणारा पहिला फलंदाज ठरला. आता अँजेलो मॅथ्यूजची ही विकेट पाहून तर तो विचित्र पद्धतीने विकेट गमावण्यात प्रसिध्द होणार का असे म्हटले जात आहे. श्रीलंका-अफगाणिस्तान कसोटी सामन्याच्या दुसऱ्या दिवसाचे १७ चेंडू बाकी होते. श्रीलंकेची धावसंख्या ५ विकेटवर ४१० धावा आणि अँजेलो मॅथ्यूज १४१ धावांसह खेळत होता. मग कॅश मोहम्मद नावाच्या अफगाण गोलंदाजाच्या चेंडूवर जे घडले त्यामुळे २०२३ च्या एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेत मॅथ्यूजसोबत घडलेल्या टाइमआउटच्या घटनेची आठवण पुन्हा ताजी झाली.मॅथ्यूज असं कोण आऊट होतं?आता हे संपूर्ण प्रकरण काय होते आणि कसे घडले ते जाणून घेऊया. १४१ धावा केल्यानंतर खेळत असलेल्या अँजेलो मॅथ्यूजने कॅश मोहम्मदच्या षटकातील दुसऱ्या चेंडूवर एक शॉट खेळला. या शॉटद्वारे त्याने चेंडू सीमारेषेच्या पलीकडे पाठवण्याचा प्रयत्न केला. तो आपल्या इराद्यामध्ये यशस्वी झाला पण त्या ४ धावा ना त्याच्या स्कोअरमध्ये जोडल्या जाऊ शकल्या ना संघाच्या स्कोअर बोर्डात. कारण तो चौकार मारण्याच्या प्रयत्नात अँजेलो मॅथ्यूजची विकेट पडली. म्हणजेच हा शॉट मारत असताना त्याने विकेटवर बॅट मारली. त्यामुळे तो हिट विकेटवर आऊट झाला.२५९ चेंडूत १४१ धावा करून अँजेलो मॅथ्यूजची विकेट पडली. यासह त्याने विचित्र पद्धतीने आऊट होण्याचा आणखी एक नवा विक्रम रचला. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये शतक झळकावल्यानंतर हिट विकेटवर बाद होणारा तो श्रीलंकेचा पहिला फलंदाज ठरला. यापूर्वी, गेल्या वर्षी भारतात खेळल्या गेलेल्या एकदिवसीय विश्वचषकादरम्यान, अँजेलो मॅथ्यूज आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये टाइमआउट होणारा जगातील पहिला फलंदाज ठरला होता.श्रीलंकेची अफगाणिस्तानवर पकड घट्ट कोलंबोमध्ये खेळल्या जाणाऱ्या कसोटी सामन्यात श्रीलंकेने अफगाणिस्तानवर आपली पकड घट्ट केली आहे. अँजेलो मॅथ्यूजचे १६वे कसोटी शतक आणि दिनेश चंडीमलचे १५वे कसोटी शतक यामुळे श्रीलंकेने पहिल्या डावात २१२ धावांची आघाडी घेतली असून अजून ५ विकेट शिल्लक आहेत. म्हणजे श्रीलंकेचा संघ फ्रंटफूटवर असून अफगाणिस्तानला आपला पराभव टाळणे कठीण जात आहे.Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *