[ad_1]

मुंबई– लोकप्रिय मराठमोळी अभिनेत्री धनश्री काडगावकर हिने आपल्या अभिनयाने प्रेक्षकांची मनं जिंकली. ती कायमच प्रेक्षकांच्या मनावर राज्य करत आली. तिने ‘तुझ्यात जीव रंगला’ या मालिकेत धनश्रीने नकारात्मक भूमिका साकारली होती. त्यात ती वाहिनीसाहेब या भूमिकेत दिसली होती. या भूमिकेने तिला घराघरात ओळख मिळवून दिली. नकारात्मक भूमिका असली ती प्रेक्षकांची लाडकी झाली. सध्या ती ‘तू चाल पुढं’ या मालिकेत दिसत आहे. धनश्री सोशल मीडियावरही प्रचंड सक्रिय असते. ती अनेकदा तिचे फोटो आणि व्हिडिओ चाहत्यांसोबत शेअर करत असते. आताही तिने तिच्या मुलाचा एक व्हिडिओ चाहत्यांसोबत शेअर केला आहे. जो पाहून नेटकरी त्यांच्यावर प्रेमाचा वर्षाव करत आहेत.

करण जोहरचा क्लासी एअरपोर्ट लूक

धनश्रीच्या मुलाचं नाव कबीर आहे. नुकतंच धनश्रीने इंस्टाग्रामवर तिच्या मुलासोबतचा गोड व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओत तिचा मुलगा कबीर आई तु छान दिसते म्हणाताना दिसतोय यावर तिला धनश्री विचारते, आई कशी दिसतेय? त्यावर कबीर म्हणतो छान दिसते. पुन्हा धनश्री विचारते, कबीर कसा दिसतो? छान दिसतो? यावर कबीर म्हणतो, बाबा पण छान दिसतो, यावर भावुक होत धनश्री म्हणते, आई गं… हो गं बाबा तुझा खूप छान दिसतो. आणि ती त्याच्या गालावर किस करते. धनश्रीने हा व्हिडिओ शेअर करत, बाबा प्रेम कायम आहे. लव्ह यू बाबा, असं या व्हिडिओला कॅप्शन दिलं आहे. सध्या धनश्रीचा हा व्हिडिओ तिच्या चाहत्यांना प्रचंड आवडत आहे.


या दोघांचा क्यूटनेस पाहून चाहते व्हिडिओवर कमेंट्सचा वर्षाव करताना दिसतायेत. एका युजरने कमेंट करत लिहीलं, ‘खूप गोड आहे पिल्लू.’ तर अजून एकाने कमेंट करत लिहीलं, ‘खूप क्यूट.’ तर अजून एकाने कमेंट करत म्हटलं, ‘कबीर आणि कबीरची आई खूपच गोड आहेत.’ तर अजून एकाने म्हटलं, ‘खूपच गोड गॉड ब्लेस यू.’ अशा अनेक प्रकारच्या कमेंट चाहते त्यांच्या या व्हिडिओवर करत आहेत.

स्टुडिओ वाचवण्याचा त्या दिवसाचा नितीन देसाईंचा शेवटचा प्रयत्न अन् न सहन होणारा ताण, सहकाऱ्याचा गंभीर आरोप[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *