नवी दिल्ली : विरोधकांमध्ये लढण्याची क्षमता उरली नाहीये. काही लोक मतदारसंघ बदलण्याच्या तयारीत आहेत. (सोनिया गांधी दुसरा मतदारसंघ चाचपत आहेत असं वृत्त) निवडणूक जवळ आल्या आहेत. जरा मेहनत करा, १० वर्ष उलटून गेले तरीही काँग्रेस चांगला विरोधी पक्ष बनू शकला नाहीये, अशा शब्दात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसवर सडकून टीका केली. काँग्रेस हा घराणेशाहीचा पक्ष आहे. एकाच कुटुंबातील लोक राजकारणात असणं गैर नाहीये, पण पक्ष एका व्यक्तीभोवती फिरणं हे चांगलं नाहीये, असंही ते म्हणाले. दुसरीकडे मोदी काँग्रेसला लक्ष्य करत असताना लोकसभेत उपस्थित काँग्रेस खासदारांनी जोरदार घोषणाबाजी केली.

राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर पंतप्रधान नरेंद्र मोदी लोकसभेत उत्तर देत आहेत. त्यांनी आपल्या कार्यकाळातील योजना सांगतानाच काँग्रेस पक्ष कसा चुकीचा आहे, हे ठसविण्याचा प्रयत्न केला. भारतीय लोक आळशी आहेत, असं नेहरूंना वाटायचं. लाल किल्ल्यावरून केलेल्या भाषणात त्यांनी तसं वक्तव्य केलं होतं. इंदिरा गांधी यांनाही तेच वाटायचं, असं सांगून आपल्या भाषणाचा नेहरू-गांधीविरोधी टोन सेट केला.

मोदी म्हणाले, तरुण खासदारांना काँग्रेस अजिबात वाव देत नाही. काँग्रेसच्या या वृत्तीमुळे देशाचं नुकसान झालं आहे. एकाच कुटुंबातील लोक राजकारणात असणं गैर नाहीये, पण पक्ष एका व्यक्तीभोवती फिरणं हे चांगलं नाहीये. अधीर रंजन चौधरी, मलिल्लार्जून खरगे, गुलाम नबी आझाद हे घराणेशाहीचे बळी असल्याचं ते म्हणाले.

काँग्रेस प्रत्येक योजनांना विरोध करते, योजना मोदींच्या नाहीत, देशाच्या आहेत, पुढची अनेक वर्ष काँग्रेसला विरोधी पक्षातच बसायची आहेत, पुढच्या वर्षी तर काँग्रेसला प्रेक्षक गॅलरीत बसायचे आहे, अशी टोलेबाजीही त्यांनी केली.

विरोधक म्हणतात- विकास आपोआप होईल, पण विकास होत नसतो, तो करावा लागतो. त्यात सरकारचं योगदान सर्वांत जास्त असतं. अर्थव्यवस्थेत २०१४ मध्ये भारत ११ व्या स्थानी होता. आज ५ व्या क्रमांकावर आहे, इतका विकास आपोपाप झाला का? आमच्या तिसऱ्या कार्यकाळात अर्थव्यवस्था पाच ट्रिलियन डॉलर असेल. ये मोदी की गॅरंटी हैं, असंही ते म्हणाले.

आम्ही ४ कोटी घरं बांधली, ४० हजार किमी रेल्वे रुळांचं रुगीकरणं, १० वर्षांत १७ कोटी गॅस कनेक्शन दिली, ५५ कोटी गरिबांना आयुषमान भारत कार्ड दिली, ८० कोटी लोकांना विनामूल्य धान्य दिलं. काँग्रेसच्या सुस्त वेगाशी स्पर्धाच होऊ शकत नाही. काँग्रेसच्या वेगाने एवढ्या विकासाला १०० वर्ष लागली असती, असंही विधान मोदींनी केलं.Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *