बीड : बारामतीत भाषण करताना अजित पवार यांनी थेट शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांच्याविरोधात प्रचाराला सुरूवात करताना लोकसभेला मी उमेदवार आहे असं समजून प्रचार करा, असं आवाहन केलं. जिथे राष्ट्रवादीचे खासदार आहेत तिथे मी उमेदवार देणार आहे असं सांगून युती असली तरी बारामती भाजपला न देता आपणच लढविणार असेच अजित पवार यांनी अप्रत्यक्षपणे संकेत दिले. त्यांच्या याच आक्रमक भाषणावर रोहित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

आम्हाला माहिती असलेले दादा आणि आताचे दादा हे फार वेगळे आहेत. केवळ भाजप श्रेष्ठींना दाखवण्यासाठी हा सर्व खटाटोप त्यांच्याकडून सुरू असून आगामी लोकसभा निवडणुकीत अजित पवार यांच्याच कुटुंबातील एखादा व्यक्ती त्यांच्या पक्षाकडून उमेदवार म्हणून येऊ शकतो याची खात्री आम्हाला पटली आहे. अशी शक्यता रोहित पवार यांनी बोलून दाखवली आहे. त्याचवेळी अजित पवार यांच्या बोलण्यात अहंकार जाणवतोय तो बारामतीची जनता उतरविल्याशिवाय राहणार नाही, असा पलटवार रोहित पवार यांनी केला.

भाजपला दाखविण्यासाठी जरी खटाटोप असला तरी ज्यांना विजयाची शक्यता नसते तीच लोकं अशा प्रकारची वक्तव्ये करतात. परंतु बारामतीची जनता ही पवारसाहेबांसोबत आहे, असं आमदार रोहित पवार यांनी म्हटले आहे. ते बीडमध्ये मीडियाशी बोलत होते.

अजित पवार काय म्हणाले होते?

“काही लोक तुम्हाला भावनिक बनवतील. खासदारकीला इकडे मत द्या, आमदारकीला अजितला द्या असे म्हणतील. पण मला दोन्ही ठिकाणी तुमची साथ गरजेची आहे. खासदारकीला मला मिठाचा खडा लागला तर आमदारकीला मी स्वतःच वेगळा विचार करेन”

“राज्यात एनडीएकडून ४८ जागांचे वाटप होईल. मागे जिथे राष्ट्रवादीचे खासदार होते, त्या जागा आपल्याला मिळतील. आपल्या विचारांचा खासदार झाला तर मोदी, शाहांकडून मी हवी तेवढी विकासाची कामे मंजूर करून आणू शकतो. त्यासाठी माझ्याच विचारांचा खासदार असणे आवश्यक आहे. मला खासदारकीला मिठाचा खडा लागला तर आमदारकीला मी वेगळा विचार करेन, त्यावेळी कुणाच्या बापाचे ऐकणार नाही”Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *