[ad_1]

मुंबई- ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ बऱ्याच दिवसांपासून चर्चेत आहे. शोचे निर्माते असित मोदी यांच्यावर रोज एक ना एक आरोप होत आहे. शैलेश लोढा यांनीही त्यांच्यावर गुन्हा दाखल केला होता. निर्मात्यांनी थकबाकी दिली नसल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला. काही दिवसांपूर्वीच या केसचा निकाल लागला आणि न्यायालयाने असित यांना एक कोटी रुपये भरण्याचे आदेश दिले. यानंतर शैलेशने आपल्या विजयाबद्दल आनंद व्यक्त केला असून आता असित मोदींनी त्यावर प्रतिक्रिया दिली आहे.

‘ईटाईम्स’शी खास बातचीत करताना असित मोदी म्हणाले, ‘शैलेश लोढा यांनी केस जिंकण्यासाठी खोटे दावे केले. हा खटला आपण जिंकला असे जरी ते म्हणत असले तर ते चुकीचे निवेदन करत आहेत. त्यावर सहमतीने तोडगा निघाल्याचे न्यायालयाने म्हटले आहे. चुकीची माहिती शेअर करण्यामागील त्यांचा हेतू आम्ही समजू शकत नाही. जर त्यांनी आता वस्तुस्थितीचा विपर्यास करणे थांबवले तर आम्ही त्यांचे कौतुक करू.

सुभेदार चित्रपटात पहिल्यांदाच कुलकर्णी कुटुंब दिसणार एका पडद्यावर, अभिनेत्रीने सांगितला किस्सा
शैलेश लोढा यांनी स्वाक्षरी केली नाही

असित पुढे म्हणाला, ‘जेव्हा एखादा कलाकार शो सोडण्याचा निर्णय घेतो, तेव्हा तो काही कागदपत्रांवर स्वाक्षरी करतो, ज्यामुळे तो शो सोडून गेला होता हे सिद्ध होते. ही एक मानक प्रक्रिया आहे जी सर्व कलाकार अनुसरण करतात. मात्र शैलेशने ते करण्यास साफ नकार दिला. आम्ही कधीही पैशासाठी नकार दिला नाही. एक्झिट लेटरच्या अटींबाबत काही समस्या असल्यास, आम्ही मिटिंगसाठी श्री लोढा यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. वारंवार प्रयत्न करूनही, बाहेर पडण्याच्या कागदपत्रांच्या अटींना अंतिम रूप देण्याऐवजी, श्री लोढा यांनी एनसीएलटीकडे त्यांची देणी मागितली.’

याहू…सुपरकूल अभिनेते शम्मी कपूर

कोणालाही काहीही न सांगता शो सोडला

त्याचवेळी सोहेल रमाणीने असेही सांगितले की, ‘फेब्रुवारी २०२२ मध्ये शैलेशने एकदा मेल करून सांगितले की तो शो सोडत आहे. मात्र, एका दिवसानंतर तो सेटवर आला होता. अखेरीस तो अचानक कोणतीही सूचना न देता शोमधून बाहेर पडला. त्यामुळे केवळ लोढा यांच्या बाबतीतच नाही, तर कोणत्याही कलाकाराला रिलीव्हिंग लेटरवर सही करणे बंधनकारक आहे.

11 मुल्कों की पुलिस ढूंढती है मुझे, मगर पकड़ पाया है कौन… आता बाजीराव होणार डॉन ३
शैलेश लोढा यांना वेळेवर पैसे दिले

असित यांनी सांगितले की, शैलेश त्यांच्यासोबत १४ वर्षांपासून काम करत होता. ते आमच्यासाठी कुटुंबासारखे होते. कामाच्या व्यतिरिक्त आम्ही सुरुवातीच्या दिवसात त्याला खूप सपोर्ट केला आहे. व्यावसायिक बाजूने, त्याला वर्षानुवर्षे वेळेवर पैसे दिले गेले आहेत. एवढ्या वेळात आम्ही कधीच तक्रारी ऐकल्या नाहीत. त्यामुळे शो सोडल्यानंतर त्याचे वागणे पाहून आम्हाला आश्चर्य वाटले. त्याचे पेमेंट थांबवण्याचा आमचा कोणताही हेतू नव्हता. पण बाकीच्या कॉर्पोरेटप्रमाणेच जाण्याची औपचारिकता पूर्ण करणे आवश्यक आहे.

[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *