[ad_1]

कोल्हापूर : राज्य नियोजन मंडळाचे अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी आणि त्यांच्या कुटुंबीयांनी वरपे कुटुंबीयांना केलेल्या मारहाण प्रकरणी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी कोल्हापूर जिल्ह्याचे पोलीस प्रमुख महेंद्र पंडित यांना झापलं आहे. दबावाखाली पोलीस अधिकारी वरपे यांची तक्रार नोंदवून घेत नसून राजेश क्षीरसागर आणि त्यांच्या कुटुंबीयांवर गुन्हा दाखल करत नसल्याचे सांगत अंबादास दानवे यांनी थेट महेंद्र पंडित यांना फोन करत जाब विचारला. एसपी साहेब तुमची आणि क्षीरसागर यांची मस्ती चालणार नाही, असं म्हणत अंबादास दानवे यांनी पोलिस अधीक्षक महेंद्र पंडित यांची खरडपट्टी काढली.

नेमकं प्रकरण काय?

दीड दोन महिन्यापूर्वी राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर आणि त्यांचे सुपुत्र ऋतुराज क्षीरसागर यांचा कोल्हापुरातील त्यांच्याच इमारतीत राहणाऱ्या वरपे कुटुंबीयांशी वाद झाला होता आणि या वादातून झालेल्या मारहाणीचा व्हिडिओ राज्यभर चर्चिला गेला. याबाबत मारहाण झालेला व्हिडिओ समोर येऊनही पोलिसांनी क्षीरसागर यांच्या विरोधात साधी तक्रारही दाखल केली नाही. याप्रकरणी राजेंद्र वरपे यांनी आज विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्यापुढे जनता दरबारात गाऱ्हाणं मांडलं. दानवेंनी तत्काळ जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांना फोन करून तक्रार दाखल का झाली नाही? असा जाब विचारला. पोलीस आणि राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांची मस्ती चालणार नाही असा सज्जड दमच दानवेंनी भरला.

क्षीरसागरांची मस्ती चालणार नाही, अंबादास दानवेंनी पोलिसांना फोनवरच झापलं

कोल्हापुरातील शनिवार पेठ असणाऱ्या शिवगंगा अपार्टमेंटमध्ये राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर आपल्या कुटुंबीयांसोबत राहतात. याच अपार्टमेंटमध्ये राजेंद्र वरपे वास्तव्यास आहेत. अपार्टमेंटच्या टेरेसवरती वारंवार होणाऱ्या राजकीय पार्ट्यांचा अपार्टमेंटमधील वरपे कुटुंबीयांना त्रास होत होता. यापूर्वी याबाबत माजी आमदार क्षीरसागर यांना याबाबत कळवूनही त्यांनी याकडे दुर्लक्ष केले.

१० डिसेंबरच्या मध्यरात्री टेरेसवर असाच प्रकार सुरू असताना वरपे हे क्षीरसागर यांना जाब विचारायला गेले. मात्र यावेळी मद्यधुंद अवस्थेत असलेल्या क्षीरसागर यांच्या कार्यकर्त्यांकडून आणि माजी आमदार राजेश क्षीरसागर, पुत्र ऋतुराज क्षीरसागर यांच्याकडून वरपे यांच्यासह त्यांच्या १५ वर्षीय मुलाला बेदम मारहाण करण्यात आली. मारहाण करतानाचे सीसीटीव्ही फुटेज समाज माध्यमात व्हायरल होऊनही कोल्हापूर पोलिसांनी वरपे यांची साधी धाव तक्रार दाखल करून घेतली नाही.

उद्धव ठाकरे यांचा अजित पवार यांना दणका, बड्या नेत्याच्या हाती शिवबंधन

आज कोल्हापुरातील शासकीय विश्रामगृह येथे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी जनता दरबार भरवला होता. यावेळी मारहाण झालेले राजेंद्र वरपे यांनी याबाबतचं गाऱ्हाण दानवेंसमोर मांडलं. जनता दरबार पुणे पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांना फोन करून तक्रार का दाखल झाली नाही असा जाब विचारला आणि राजेश क्षीरसागर आणि पोलिसांची मस्ती चालणार नाही असा दम भरला.

तू त्याचे वकीलपत्र घेवून आला का? कॉंग्रेस भवनमध्ये उपाध्यक्षाला मारहाण, पुण्यात तुफान राडा

[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *