[ad_1]

नवी दिल्ली : प्रत्येक व्यक्ती कठोर संघर्षातूनच यश मिळवतो. मग ते उद्योगपती असो किंवा सरकारी अधिकारी, जिद्द आणि मेहनतीच्या बळावर त्यांनी देशातच नव्हे तर जगभर नाव कमावलं आहे. आज आम्ही तुम्हाला अशाच एका व्यावसायिकाची कहाणी सांगणार आहोत ज्याने आपलं सर्वकाही गमावून दुसरा व्यवसाय सुरू केला आणि कोट्यवधींची कंपनी उभी केली. आज या लेखात आपण प्रसिद्ध बांधकाम कंपनी दिलीप बिल्डकॉनचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक दिलीप सूर्यवंशी यांच्या आजवरच्या यशाबद्दल जाणून घेणार आहोत.

दिलीप बिल्डकॉन कंपनी
मध्य प्रदेशातील बांधकाम क्षेत्रात काम करणाऱ्या या प्रसिद्ध कंपनीने देशभरातील महामार्ग आणि द्रुतगती मार्गांसह अनेक मोठ्या प्रकल्पांचे करार पूर्ण केले आहेत. अलीकडेच दिलीप बिल्डकॉनला राज्य सरकारकडून ७०० कोटी रुपयांचा पायाभूत प्रकल्पही मिळाला आहे.

एका मेसेजने सुन्न झाल्या इंदिरा गांधी, रातोरात बदलले नियम, भेटा औषध उद्योगातील रॉबिनहूडला
पहिला व्यवसाय बुडाला
दिलीप बिल्डकॉनला नामांकित कंपनी बनवण्याची कहाणी खूप रंजक आहे. या कंपनीची स्थापना दिलीप सूर्यवंशी यांनी १९८७ मध्ये केली होती. जबलपूर विद्यापीठातून स्थापत्य अभियांत्रिकी पदवीधर असलेल्या दिलीप सूर्यवंशी यांना या क्षेत्रातील ३६ वर्षांचा अनुभव असून २०१६ मध्ये कंपनी स्टॉकमध्ये लिस्ट करण्यात अली होती.

सुरूवातीपासून दिलीप यांना दुसऱ्याची चाकरी न करता स्वतःचा व्यवसाय करायचा होता. म्हणून शिक्षणानंतर १९७९ मध्ये त्यांनी भोपाळ येथे भावाच्या सोयाबीन कारखान्याचे काम पाहण्यास सुरुवात केली, परंतु दुष्काळामुळे त्यांना व्यवसाय बंद करावा लागला. त्यानंतर त्यांनी स्वतःची बांधकाम कंपनी सुरू केली.

कधी खिशात २५ पैसे नव्हते, उपाशी पोटी झोपले; कष्टाचं चीज करून जमवली ५०० कोटींची संपत्ती
कर्मचाऱ्याला बनवले भागीदारी
१९९५ मध्ये त्यांनी देवेंद्र जैन या २१ वर्षीय अभियंत्याला नोकरीवर ठेवले. फोर्ब्सच्या अहवालानुसार देवेंद्र जैन यांच्या कामाने दिलीप सूर्यवंशी इतके प्रभावित झाले की त्यांनी नंतर देवेंद्र जैन यांना त्यांच्या व्यवसायातील ३१% भागीदार बनवले. सध्या देवेंद्र जैन यांच्याकडे कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून जबाबदारी आहे. हुरून लिस्ट २०२१ नुसार दिलीप सूर्यवंशी यांची एकूण संपत्ती ४१०० कोटी रुपये होती, तर देवेंद्र जैन २३०० कोटींचे मालक आहेत.

दहावीपर्यंत शिक्षण, स्टेशनवर रात्र घालवली… विस्फोटकांच्या क्षेत्रात एंट्री, मग धावत आली लक्ष्मी
आईची इच्छा म्हणून नोकरी नाही केली

दिलीप सूर्यवंशी यांनी नोकरी करू नये अशी आईची इच्छा होती. त्याचे कारण म्हणजे की सूर्यवंशी यांचे वडील पोलिसात नोकरीला असल्याने त्यांची बदली व्हायची. वडिलांची बदली झाल्याने मुलांना खूप त्रास सहन करावा लागत असल्याचे आईने सांगितले. दिलीप यांनी भोपाळ येथील शाहजहानाबाद येथील पोलीस लाईन येथील बारादरी शाळेत शिक्षण घेतले. त्यानंतर १९७९ मध्ये जबलपूर येथून सिव्हिल इंजिनीअरिंग केले. आईच्या सांगण्यावरून शिक्षणानंतर त्यांनी स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यासाठी प्रयत्न सुरू केले.

पत्नीचे दागिने गहाण ठेवले
यश मिळवण्यासाठी दिलीप यांना खूप संघर्ष करावा लागला. सुरुवातीच्या काळात त्यांनी व्यवसायासाठी पत्नीचे दागिने गहाण ठेवले होते. १९८८ मध्ये त्यांनी दिलीप बिल्डकॉन नावाची कंपनी स्थापन केली. सुरुवातीला त्यांनी छोटे निवासी प्रकल्प, सरकारी इमारती आणि पेट्रोल पंप बांधले. त्यानंतर १९९५ मध्ये २१ वर्षीय अभियंता देवेंद्र जैन यांना कामावर ठेवले. इमारत बांधताना दिलीप सूर्यवंशी यांचे लक्ष रस्ता बांधकामाकडे वळले. २००० च्या दशकाच्या सुरुवातीला एनडीए सरकारने रस्ते बांधणीसाठी निविदा काढली तेव्हा त्यांनी ठरवले की त्यांची कंपनी रस्ते बांधणीचे कामही करेल.

[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *