[ad_1]

पुणे : पुण्यात पीएमपीएमएल डेपोमध्ये कंडक्टर म्हणून कार्यरत असलेल्या एका ३० वर्षीय महिलेचा विनयभंग झाल्याचा आरोप आहे. महिलेच्या ओळखीतील सहकाऱ्याने पाठलाग करून तिच्या मनास लज्जा उत्पन्न होईल अशाप्रकारे हातवारे करत तिचा विनयभंग केल्याचा आरोप केला जात आहे. या प्रकरणी संबंधित आरोपी विरोधात पीडित महिलेने बंडगार्डन पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. त्यानुसार आरोपीला अटक करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी सोमवारी दिली आहे.

सुनील धोंडीभाऊ भालेकर (वय ४३ वर्ष, राहणार – कानहुर पठार, तालुका-पारनेर, जिल्हा अहमदनगर) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. या प्रकरणी आरोपीवर बंडगार्डन पोलीस ठाण्यात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार ५ जून २०२३ ते ४ ऑगस्ट २०२३ या दरम्यान घडलेला आहे.

माकडाने दरीत फेकलेल्या पर्समध्ये होते ३५ हजार, जीव धोक्यात घालून ‘ते’ २०० फूट उतरले, अन्…
पीडित महिलेने दिलेल्या तक्रारीनुसार, संबंधित महिला ही पुण्यातील पीएमपीएमएल डेपोमध्ये कंडक्टर म्हणून कार्यरत आहे. आरोपी सुनील भालेकर हा तिच्या कामाच्या ठिकाणी ओळख झालेला सहकारी आहे. तो मागील दोन महिन्यापासून महिलेचा पाठलाग करत होता.

प्रेमात अडथळा, आईसोबत सतत भांडण; मुलीनं आई अन् प्रियकराच्या मदतीने वडिलांचा काटा काढला

महिलेच्या मनाला लज्जा उत्पन्न होईल अशा प्रकारे हातवारे करून, शिट्टी मारून तिला कामावर असताना ,’ तू माझ्याकडे दुर्लक्ष करत आहेस, मला तू खूप आवडतेस, माझ्या प्रेमाचा स्वीकार कर’ असे बोलून तिचा विनयभंग करून शिवीगाळ व धमकी दिल्याने आरोपीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक एम मधाळे याबाबत पुढील तपास करत आहेत.

टोमॅटो विकून ४० लाख कमावले, कोट्यधीश होण्याचा विश्वास; शेतकरी म्हणतो, आता फक्त गृहलक्ष्मी हवी

[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *