चंद्रपूर: भंगाराम तळोधी उच्च प्राथमिक शाळेत बीटस्तरीय क्रिडा स्पर्धा सुरू होत्या. या स्पर्धेत सहभागी विद्यार्थी आणि शिक्षकांकरिता स्वयंपाक बनविण्याचे काम सुरू होते. अशातच गॅस लीक झाला अन् आग लागली. क्षणार्धातच सिंलेडरचा स्फोट होईल या भितीने साऱ्यांचीच दाणादाण उडाली. अशा आणीबाणीच्या परिस्थितीतीत गावातील लाईनमॅन सचिन पिंपळशेडे यांनी हिंमत दाखविली. त्यांनी तातडीने सिंलेडरचा कॉक बंद केला. यात त्यांचा हात भाजला पण त्याची पर्वा न करता त्यांनी जवळपास असलेल्या अनेक चिमुकल्या विद्यार्थ्यांचा जीव वाचविला.
ना जेलमध्ये जायचं ना शिंदे गटात, रवींद्र वायकर यांची निकटवर्तींयाकडे उद्विग्नता पण ईडीपुढे काही चालेना!
मिळालेल्या माहितीनुसार, गोंडपिपरी पंचायत समितीअंतर्गत भंगाराम तळोधी आणि विठठलवाडा या बिटातील क्रिडा स्पर्धा भंगाराम तळोधी येथील उच्च प्राथमिक शाळेत घेण्यात आल्या. या स्पर्धेकरिता शिक्षण विभागाने मोठी तयारी केली होती. यावेळी शाळेतील विद्यार्थी, केंद्रातील शिक्षक मंडळी आणि गावातील लोकप्रतिनिधी उपस्थित होते. उपस्थित विद्यार्थी आणि शिक्षकांना जेवन बनविण्याची तयारी सुरू झाली. शाळेतील एका खोलीत शालेय पोषण आहार तयार करणाऱ्यांनी आपल्या कामाला सुरुवात केली. सर्वांना एकसारखे जेवन बनविणे सुरू असताना काही शिक्षकांनी आम्हाला टॉमेटोची चटणी बनवून द्या, असे त्यांना सांगितले. एकीकडे शेकडो लोकांचे जेवन बनविण्यात त्या व्यस्त होत्या, अशाही स्थितीत त्यांनी टॉमेटोची चटणी बनविण्यासाठी सुरुवात केली.

मात्र यानंतर त्यांचे याकडे दुर्लक्ष झाले. अशातच अचानकपणे आग लागली. अशातच गॅस ली क झाल्याने गंभीर परिस्थिती निर्माण झाली. एकच कल्लोळ सुरू झाला. क्षणभरात होत्याचे नव्हते होणार होते. सारेच जण पळायला लागले. पण अशा आणीबाणीच्या स्थितीत गावातील लाईनमॅन सचिन पिंपळशेंडे यांनी आपल्या जिवाची पर्वा न करता तातडीने सिंलेडरचे कॉक बंद केले. यात त्यांचा हात भाजला. पण शेवटी आगीवर नियंत्रण मिळविण्यात यश आले. ज्या ठिकाणी ही भीषण स्थिती निर्माण झाली. त्याठिकाणी अनेक विद्यार्थी होते. क्षणभरात सचिन पिंपळशेडे यांनी तप्तरता दाखविली नसती तर अनेकांचा नाहक बळी जाऊन मोठी दुर्घटना घडली असती.

Amol Kolhe : छत्रपती संभाजी महाराजांच्या वेशात एन्ट्री घेताना NCP पक्षाचा निर्णय आला, अमोल कोल्हेंनी किस्सा सांगितला

शिक्षकांनी चटणी बनविण्याचा आग्रह धरला अन हा प्रकार घडल्याचे लक्षात येताच लोकप्रतिनीधींनी शिक्षकांना चांगलेच धारेवर धरले. सचिन पिंपळशेंडे यांनी दाखविलेल्या तप्तरतेचे कौतुक करत माजी जि.प.सदस्य अमर बोडलावार, वैष्णवी बोडलावार, जयेश कारपेनवार तसेच अनेक पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत पिंपळशेंडे यांचा सत्कार करण्यात आला. जिल्हा परिषदेच्या शाळेत होणारा मोठा प्रसंग टळल्याने पालकांनी सुटकेचा निश्वास सोडला. लाईनमॅन सचिन पिंपळशेंडे यांच्या या साहसपुर्ण कामगिरीबाबत अनेकांनी त्यांचे कौतुक केले आहे.Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *