[ad_1]

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज माजी पंतप्रधान चौधरी चरण सिंह, माजी पंतप्रधान पी.व्ही. नरसिंह राव आणि डॉ. एम.एस. स्वामीनाथन यांना भारतरत्न पुरस्कार जाहीर केला आहे. नरेंद्र मोदी यांच्या या घोषणेनंतर अखिलेश यादव यांना धक्का बसला आहे. जयंत चौधरी यांचा एनडीएतील प्रवेश जवळपास निश्चित झाला आहे. राष्ट्रीय लोक दलाचे प्रमुख जयंत चौधरी हे त्यांचे आजोबा माजी पंतप्रधान चौधरी चरण सिंह यांना भारतरत्न पुरस्कार जाहीर झाल्यानंत भावूक झाल्याच दिसून आले.

जयंत चौधरी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानले. भाजपच्यासोबत जाणार की नाही यासंदर्भात विचारलं असता त्यांनी आता मी त्यांना कोणत्या तोंडानं नाही म्हणू असं म्हटलं.

जयंत चौधरी म्हणाले आज देशासाठी मोठा दिवस आहे. मी भावूक असून मी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचे आभार मानतो. संपूर्ण देश त्यांचे आभार मानेल. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना देशाची नस समजते.

LK Advani Bharat Ratna : मोठी बातमी, लालकृष्ण अडवाणी यांना भारतरत्न जाहीर, नरेंद्र मोदी यांची घोषणा
आज कामगार वर्ग, शेतकरी आणि मजुरांचा सन्मान केला जात आहे. या गोष्टी करण्याची क्षमता दुसऱ्या सरकारमध्ये राहिलेली नाही. आज वडील अजित सिंह यांची आठवण येते. मला किती जागा हव्या आहेत, याकडे लक्ष देऊ नका, मी कोणत्या तोंडानं नकार देऊ, मी काहीही डिलीट करणार नाही. जशी राजकीय स्थिती असते त्यानुसार गोष्टी मांडत असतो, असं जयंत चौधरी म्हणाले.

सूत्रांच्या माहितीनुसार भाजप आणि राष्ट्रीय लोक दल यांच्यामध्ये आघाडी होणार आहे. राष्ट्रीय लोक दल २ जागा लढवेल. बागपत आणि बिजनोर हे दोन मतदारसंघ जयंत चौधरींना दिले जाण्याची शक्यता आहे. याशिवाय आरएलडी यांना राज्यसभेची एक जागा दिली जाऊ शकते.
१७ दिवसांत ५ भारतरत्न; पुरस्कारांच्या माध्यमातून नेमके कोणते प्रयत्न? काय साधलं यातनं

जयंत चौधरींना विजयाची प्रतीक्षा

जयंत चौधरी यांच्या राष्ट्रीय लोक दल पक्षाला पश्चिम उत्तर प्रदेशमधील जाट, शेतकरी आणि मुस्लिम बहुसंख्य मतदारांचा पाठिंबा मिळत असतो. या भागात लोकसभेच्या २७ जागा येतात. या पैकी १९ जागांवर भाजपला विजय मिळाला होता. तर, ८ जागा विरोधी पक्षांना मिळाल्या होत्या. यामध्ये ४ जागा समाजवादी पक्षाला आणि ४४ जागा बहुजन समाज पार्टीला मिळाल्या होत्या.
चौधरी चरण सिंह, नरसिंह राव आणि एम.एस. स्वामीनाथन यांना भारतरत्न जाहीर,नरेंद्र मोदींची ट्विटद्वारे घोषणा

भारतरत्न पुरस्कारांची घोषणा आणि इंडियाला धक्का

नरेंद्र मोदी यांनी २३ जानेवारी रोजी जननायक कर्पुरी ठाकूर यांना भारतरत्न पुरस्कार जाहीर केला होता. त्यानंतर इंडिया आघाडीतून नितीश कुमार बाहेर पडले आणि एनडीएसोबत गेले. दुसरीकडे आज देखील माजी पंतप्रधान चौधरी चरण सिंह यांना भारतरत्न जाहीर होताच जयंत चौधरी यांनी एनडीएसोबत जाण्याचे संकेत दिले आहेत. जयंत चौधरी यांनी अखिलेश यादव यांच्या समाजवादी पक्षासोबत आघाडी केली होती. विधानसभा निवडणूक त्यांनी सोबत लढवलेली होती. आता जयंत चौधरी भाजपप्रणित एनडीएसोबत जाण्याची शक्यता आहे.

[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *