[ad_1]

चेन्नई : सहाव्या खेलो इंडिया युवा स्पर्धा २०२३ मध्ये महाराष्ट्राने जेतेपद कायम राखले. पुन्हा एकदा महाराष्ट्राने त्यांचे वर्चस्व सिद्ध केले. तेलंगणाच्या वृत्ती अगरवालने जलतरणात पाच सुवर्णपदक जिंकून स्पर्धा संपवली.

महाराष्ट्राचा जलतरणपटू ऋषभ दासने प्रथम मुलांच्या ५० मीटर फ्रीस्टाइलमध्ये सुवर्णपदक जिंकले आणि त्यानंतर ४ बाय १०० मीटर फ्रीस्टाइलच्या अंतिम फेरीत महाराष्ट्राच्या पदकात भर घातली. महाराष्ट्राने या स्पर्धेत एकूण १५६ पदकं जिंकली. त्यात ५७ सुवर्ण, ४८ रौप्य व ५३ कांस्यपदकांचा समावेश आहे. दुसऱ्या स्थानावरील तामिळनाडूने शेवटच्या दिवशी तीन सुवर्णपदकं जिंकली. त्यांनी या स्पर्धेत ३८ सुवर्ण, २१ रौप्य व ३९ कांस्यपदकांसह स्पर्धेचा निरोप घेतला. खेलो इंडिया युवा स्पर्धेच्या इतिहातील ही त्यांची सर्वोत्तम कामगिरी ठरली. हरयाणा प्रथमच अव्वल-दोन स्थानांवरून घसरला आणि ३५ सुवर्ण, २२ रौप्य आणि ४६ कांस्यपदकांसह तिसरे स्थान पटकावले. दिल्ली ( १३ सुवर्ण, १८ रौप्य व २५ कांस्य )ने राजस्थानला ( १३ सुवर्ण, १७ रौप्य व १७ कांस्य ) मागे टाकले.

स्पर्धेच्या शेवटच्या दिवशी फक्त फुटबॉल, टेनिस, टेबल टेनिस आणि जलतरण या खेळांत चुरस रंगली. कोणता जलतरणपटू खेळातील सर्वात यशस्वी ऍथलीट होण्याचा दावा करेल हे पाहण्यासाठी एक्वाटिक कॉम्प्लेक्समध्ये सर्वांचे लक्ष लागले होते आणि वृत्तीने पाचही गटात सुवर्णपदकांवर दावा सांगितला. बुधवारी, तिने २:२२.८९ सेकंदाच्या वेळेसह २००मीटर बटरफ्लायमध्ये सुवर्णपदक जिंकले. ती दुसऱ्या स्थानावर असलेल्या कर्नाटकच्या ऋतिका महेश बंगळुरूच्या जवळपास चार सेकंद पुढे होती.

२०२२च्या आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व करणाऱ्या १७ वर्षीय मुलीने १७:५९.५१ सेकंदांच्या वेळेसह १५०० मीटर फ्रीस्टाईल गटाचे मुकुट जिंकले. कर्नाटकच्या अदिती मुळेने ( १८:१२.७७ सेकंद) आणि श्री चरणी तुमू ( १८:१७.८५ सेकंद) अनुक्रमे रौप्य आणि कांस्यपदक जिंकले. राजस्थानच्या युग चेलानीलाही पाच सुवर्णपदकांसह पूर्ण करण्याची संधी होती, परंतु मुलांच्या २०० मीटर बटरफ्लाय स्पर्धेत कर्नाटकच्या एस धनुषने त्याला मागे टाकले. त्यामुळे युगला चार सुवर्ण आणि एक रौप्यपदक जिंकता आले.

मुंबई इंडियन्सचं कर्णधारपद पांड्याला, पुणेकरांच्या प्रतिक्रिया काय?

SDAT टेनिस संकुलात, तामिळनाडूच्या रेथिन प्रणव आरएस आणि एमआर रेवती यांनी आरामात सुवर्णपदक जिंकले. मुलांच्या अंतिम फेरीत प्रणवचा प्रतिस्पर्धी महाराष्ट्राच्या काहिर वारिकने ६-२, ३-० अशी पिछाडीवर असताना निवृत्ती पत्करली, तर मुलींच्या अंतिम फेरीत रेवतीने तेलंगणाच्या लक्ष्मी सिरी दांडूचा ६-१, ६-३ असा पराभव केला. प्रणव आणि रेवतीने मंगळवारी मुला-मुलींच्या दुहेरीत आपापल्या जोडीदारांसह सुवर्णपदक जिंकले.

[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *