पुणे : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात फूट पडल्यानंतर अजित पवार यांना निवडणूक आयोगाने चिन्ह आणि पक्ष दोन्ही दिले. त्यानंतर आज पुण्यातील बालेवाडी येथे राष्ट्रवादी युवक मेळावा पार पडला. या मेळाव्यात अजित पवार यांनी पुन्हा शरद पवार यांच्यावर नाव न घेता निशाणा साधला आहे. या पार्टीत कोणालाही फोन केले जात नव्हते. कुणाचीही विचारपूस केली जात नव्हती. मात्र आता फोन केले जातात, विचारपूस केली जाते. मात्र तुमच्या मनाची कोणतीही चलबिचल होऊ देऊ नका आणि याला बळी पडू नका, असे आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी युवा कार्यकर्त्यांना केले.
महाराष्ट्र पूर्ण बदनाम करून टाकला; …हे पाहून जीव जळतो, उद्धव ठाकरेंची सरकारवर जहरी टीका
पिंपरी चिंचवड येथील बालेवाडी येथे राष्ट्रवादी युवक काँग्रेसचा पहायला युवा मेळावा पार पडला. त्यावेळी अजित पवार यांनी शरद पवार यांच्यावर नाव न घेता निशाणा साधला आहे. यावेळी अजित पवार यांनी कार्यकर्त्यांना कानमंत्र देखील दिले. यावेळी अजित पवार म्हणाले की, २००४ साली राष्ट्रवादी काँग्रेस ही विधानसभा निवडणुकीत सर्वात मोठा पक्ष म्हणून पुढे आला होता. त्यावेळी राष्ट्रवादीला मुख्यमंत्री पद घेता आले असते, मात्र ते घेता आले नाही. त्याच्या खोलात मी जाणार नाही. आता मात्र जरा दमाने घ्या. थोडी कळ सोसा, सारखं मुख्यमंत्री मुख्यमंत्री करू नका. अगोदर आपली संघटना मजबूत करू या, असे आवाहन अजित पवार यांनी कार्यकर्त्यांना केले आहे.

महाराष्ट्रात गादीसाठी वडिलांचे विचार सोडून लोक काहीही करतात; अमृता फडणवीसांचा उद्धव ठाकरेंना टोला

तुमचे कुठलेही काम आणले कुठलाही प्रश्न आणला तरी तो सोडवला जाईल. आपल्याला एका नव्या विचाराने पुढे जायचे आहे. आपल्या पक्षाची कुठलीही फरफट होऊ नये, यासाठी ही नवी भूमिका स्वीकारली असून आपल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना तिसऱ्यांदा पंतप्रधान पदावर बसवायचे आहे, कारण त्यांच्याकडे व्हिजन आहे, असे अजित पवार यावेळी म्हणाले.Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *